शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Lockdown News: लॉकडाऊनमुळे पोटाच्या विकारांचा धोका; जीवनशैली बदलल्याचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2020 1:53 AM

लॉकडाउनमध्ये बाहेरचे खाणे बंद झाले असले, तरी घरात गृहिणी चमचमीत पदार्थ बनवित आहेत. वडे, भजी, पिज्झा असे पदार्थ अ‍ॅसिडिटीला कारणीभूत ठरत आहेत.

मुंबई : कोरोनासंकटामुळे लॉकडाउन असल्याने अनेक जण घरातूनच कार्यालयीन काम करीत आहेत. त्यामुळे नेहमीच्या जीवनशैलीत बदल झाल्याने पोट आणि पचनसंस्थेवर दुष्परिणाम होत आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे स्थूलता, अपचन, पित्त अशा आजारांनी अनेक जण हैराण असून औषधदुकानांत पचन संस्थेच्या औषधांची मागणी वाढली आहे.

लॉकडाउनमुळे घराबाहेर पडणे बंद झाले. शारीरिक हालचाल कमी झाली, व्यायाम बंद झाला. जेवणाच्या व झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू असल्याने दिवसभर एकाच जागी बसावे लागते. त्यामुळे हालचालच होत नाही आणि अपचनाचा त्रास होतो. रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे, असे चक्र सुरू झाल्याने खाण्यापिण्याच्या वेळा बदलल्या आहेत. सकाळी नऊ ही ब्रेकफास्ट व चहाची वेळ ११ ते दुपारी १२ पर्यंत गेली. त्यामुळे जेवणाची वेळही दुपारी २ ते ३ आणि रात्रीच्या जेवणाची वेळ १0 वाजल्यानंतर अशी झाली आहे. अशा वेळा पचनसंस्थेसाठी हानिकारक आहेत.

लॉकडाउनमध्ये बाहेरचे खाणे बंद झाले असले, तरी घरात गृहिणी चमचमीत पदार्थ बनवित आहेत. वडे, भजी, पिज्झा असे पदार्थ अ‍ॅसिडिटीला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करण्याचे आवाहन आहारतज्ज्ञ करीत आहेत. उन्हाळा सुरू झाल्यावर अपचनाच्या तक्रारी वाढतात. लॉकडाउनमध्ये बदललेल्या सवयी अपचनाला कारणीभूत ठरत आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे रुग्ण ओपीडीत कमी येतात. अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठतेच्या तक्रारी पूर्वीप्रमाणेच आहेत. खाण्यापिण्याच्या वेळा नियमित ठेवणे गरजेचे आहे. थोडा तरी व्यायाम करावा, तेलकट पदार्थ खाऊ नयेत, असा सल्ला केईएम रुग्णालयाचे पोटविकारतज्ज्ञ डॉ. अमित घरत यांनी दिला आहे.स्क्रीनटाइमही धोकादायकरात्रीचा स्क्रीनटाइम म्हणजे मोबाइल, टीव्ही, संगणकापुढे बसण्याची वेळ वाढल्याने झोपेची वेळही मध्यरात्रीनंतर १ किंवा त्यापुढेच गेली आहे. त्यामुळे छातीत जळजळ, अस्वस्थ वाटणे असे त्रास वाढले आहेत. या समस्यांची वेळीच दखल घेऊन जीवनशैलीत बदल न केल्यास भविष्यात शारीरिक व मानसिक समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सचिन पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या