शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

​ लाईट, कॅमेरा....अन् अ‍ॅक्टिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 05:34 IST

लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन....असे जोराने ओरडत मोठ-मोठ्या स्टार्सना आपल्या इशाºयावर नाचवणारे दिग्दर्शकही अभिनयाच्या चुंबकीय आकर्षणातून सुटू शकलेले नाहीत. आपली प्रतिभा, आपले परिश्रम पडद्यामागे राहते. कधी तेही जेगापुढे यावे असा विचार म्हणूनच या दिग्दर्शकांच्याही मनात येत असतो.

लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन....असे जोराने ओरडत मोठ-मोठ्या स्टार्सना आपल्या इशाºयावर नाचवणारे दिग्दर्शकही अभिनयाच्या चुंबकीय आकर्षणातून सुटू शकलेले नाहीत. आपली प्रतिभा, आपले परिश्रम कायमच पडद्यामागे राहते. कधी तेही जेगापुढे यावे असा विचार म्हणूनच या दिग्दर्शकांच्याही मनात येत असतो. परंतु सर्वांनाच काही अभिनयाचे हे शिवधनुष्य पेलता येत नाही. एखादाच प्रकाश झा, फरहान अख्तर असतो जो दिग्दर्शक-अभिनेता या दोन्ही भूमिकेत यशस्वी होतो. अशाच काही दिग्दर्शक-अभिनेत्यांची ही एक ओळख...प्रकाश झानामवंत दिग्दर्शक प्रकाश झा यांनी ‘जय गंगाजल’ या चित्रपटात भोलानाथ सिंग उर्फ बी. एन. सिंग ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटात प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत असतानाही प्रकाश झा यांच्या भूमिकेचे कौतुक झाले. चित्रपटात ज्या पद्धतीने त्यांनी संवादफेक केली आहे ती खरच कमालीची आहे. भावनिक दृश्यातही त्यांनी हृदयस्पर्शी अभिनय केला आहे. ज्याची समीक्षकांनीही दखल घेतली आहे. फरहान अख्तर‘दिल चाहता है’ या चित्रपटापासून दिग्दर्शक म्हणून सुरुवात केलेल्या फरहान अख्तरने पुढे ‘रॉक आॅन’, ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात अभिनयाची छाप सोडली. त्याचा चेहरा आणि त्याचे व्यक्तिमत्त्व पाहता, त्याला हीरो म्हणून पुढे येण्यास खूप कष्ट करावे लागले. परंतु अभिनयात दम असल्याने त्याने या क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. करण जोहर‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यापूर्वी करण जोहरने ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ या चित्रपटात शाहरुखच्या मित्राची छोटीशी भूमिका साकारली होती. मात्र पुढे काही त्याने असे धाडस केले नाही. बºयाच वर्षांनी ‘बॉम्बे व्हेल्वेट’मध्ये एक नव्या वळणाची भूमिका मिळाली आणि या चित्रपटात करणने जोरदार अभिनय केला. विशेष म्हणजे, स्वत: अभिनयाचा शौक बाळगणाºया अनुराग कश्यप यांनी करण जोहर यांना संधी दिली.कुणाल कोहलीदूरचित्रवाणीवरील ‘चलो सिनेमा’ या मालिकेत अँकर असणाºया कुणाल कोहली यांनी ‘हम तुम’ आणि ‘फना’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. आता कुणाल कोहली यांनीही अभिनयाची वाट धरली आहे. त्यांनी ‘फिर से’ या चित्रपटात अभिनय केला. एक परिपक्व, रोमँटिक हीरोची भूमिका त्यांनी या चित्रपटात साकारली.