राजेश खराडे , बीडदुष्काळी परिस्थितीचा बाऊ न करता प्रशासनाने राबविलेल्या योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्या तरी त्याची दाहकता कमी होणार आहे. प्रशासन आणि शेतकरी यामधला दुवा म्हणून काम करताना २४ तासही कमी पडतात. फक्त झोकून देऊन काम करण्याची गरज असल्याचे तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी सांगितले.वर्षभरापूर्वी येथील तालुका कृषी कार्यालयात योजनांचा लाभ घेण्याच्या प्रस्तावापेक्षा अधिकाऱ्याबद्दलच्या तक्रारी अर्जांची संख्या अधिक होती. केवळ शेतकरीच नव्हे तर कार्यालयातील कर्मचारीही मनमानी कारभाराला वैतागले होते. आठ महिन्यांपूर्वी तालुका कृषी अधिकारी म्हणून दिलीप जाधव कारभार पाहत आहेत. गेल्या वर्षभरात तालुक्याला जलयुक्त अभियनांतर्गत निधी मिळालेला नाही नियमित योजनांच्या आधारेच कामे झाली आहेत. एवढेच नाही तर यंदा जलयुक्त शिवार अभियनांतर्गतच्या कामांचे निविदाप्रमाणे वाटप होणार आहे. याची सुरूवातही बीड तालुका कृषी कार्यालयातूनच झाली आहे. १०० पेक्षा जास्त प्रस्ताव दाखल झाले असून त्यापैकी ६० कामांना मंजुरीही मिळाली असल्याचे जाधव म्हणाले. गेल्या आठ महिन्याच्या कालावधीत राष्ट्रीय फलोत्पादन अभियनातून ४, महाराष्ट्र राष्ट्रीय कृषी योजनेतून ५, भरड धान्य विकास कार्यक्रमातून १ अशी ३४ बाय ३४ ची शेततळी तर मनरेगांतर्गत ५८ शेततळी उभारली आहेत. खीळ बसलेली एकात्मिक पाणलोट विकासाच्या कामांना नव्याने सुरूवात करण्यात आली आहेत. प्रशासकीय योजनांच्या कामात तत्परता आणण्यासाठी शेतकऱ्यांनीही जागरूक असने गरजेचे आहे. शेती व्यवसायत आधुनिक पद्धतीचा अवलंब होत आहे. आधुनिकतेबरोबर कामांमधील नियमितताही आवश्यक आहे. शेतकरी अन् कार्यालयातील अधिकाऱ्यांशी समरस होऊन काम करताना दिवसाचे २४ तासही कमी पडत आहेत. कार्यालयाचे काम संगणीकृत करण्यात आले आहे. मात्र एवढे करूनही वेळेअभावी शेवटच्या शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नसल्याची खंत आहे. गेल्या आठ महिन्याच्या कालावधीत येथील कृषी कार्यालयाची कार्यप्रणाली बदलली असून कामाची सरूवात सकाळी वाजल्यापासून होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे समधान होत असून हीच आमच्या कामाची पावती आहे.
शेतकऱ्यांच्या सेवेत २४ तासही कमीच
By admin | Updated: March 10, 2016 00:16 IST