शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

तिशीच्या आत आरोग्य विमा घेण्याचे जाणून घ्या 5 फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 11:18 IST

आजारपणात अवाढव्य येणारा खर्च याचा कधी ना कधी फटका बसतो. यामुळे आरोग्य विमा काढण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. मात्र, हा विमा काढण्याची वयोमर्यादा लक्षात घेता वयाची काही बंधने पाळल्यास तो आणखी फायद्याचा ठरू शकतो.

मुंबई : आजारपणात अवाढव्य येणारा खर्च याचा कधी ना कधी फटका बसतो. यामुळे आरोग्य विमा काढण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. मात्र, हा विमा काढण्याची वयोमर्यादा लक्षात घेता वयाची काही बंधने पाळल्यास तो आणखी फायद्याचा ठरू शकतो. तिशी गाठायच्या आधीच आरोग्य विमा काढल्यास नेहमी चांगले असते, कारण कोणत्याही मेडिकल इमरजन्सीला तोंड देणे सोपे जाते. बऱ्याचदा सल्लागार लोकांना कमी वयातच आरोग्य विमा काढण्यास सांगतात. ते असे का सांगतात, याची पाच कारणे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 

1) जेवढे लवकर कमी वयात तुम्ही आरोग्य विमा खरेदी कराल तेवढा त्याच्या प्रिमिअम कमी बसणार आहे. जर तुम्ही 25 व्या वर्षी आरोग्य विमा खरेदी करत असाल तर 5 हजार रुपये वार्षिक द्यावे लागतील. तर 35 व्या वर्षी हिच रक्कम जवळपास 6 ते 8 हजाराच्या घरात जाईल. 

2) आरोग्य विमा कधीही काढणे फायद्याचे असते कारण आजारपण कधी सांगून येत नाही. अचानक एखादा आजार उद्भवल्यास उपचारांसाठी लाखो रुपये लागतात. आरोग्य विमा असल्यास एवढे पैसे गोळा करण्याचा तणाव राहणार नाही. 

3) आरोग्य विमा कमी वयात खरेदी केल्याचा आणखी एक महत्वाचा फायदा असा की जर तुम्हाला पहिल्या वर्षी आजारीपण आलेच नाही तर पुढील वर्षी नुतनीकरण करताना तुमच्या विम्याची सुरक्षा रक्कम वाढते. यालाच बोनस म्हणतात. म्हणजेच जर तीन लाखांचा विमा असेल तर पुढील वर्षी कमी प्रिमिअममध्ये हा विमा 4 किंवा 5 लाखांचा होतो. 

4) बरेचजण नोकरी करत असलेली कंपनी देत असलेल्या विम्यावरच अबलंबून राहतात. मात्र, नोकरीत बदल झाल्यास हे कव्हर जाते. अशा वेळी कुटुंबात आजारपण आल्यास त्याचा फटकाही बसू शकतो. तसेच या कंपन्या 50 हजारांपासून 5 लाखांपर्यंत विम्याचे संरक्षण देतात, जे भविष्यात कमी पडू शकते. यामुळे खासगी विमाही काढलेला फायद्याचा ठरतो. 

5) कमी वयात विमा घेतल्यास पत्नीच्या प्रसुतीवेळीही तो फायद्याचा ठरतो. कारण बऱ्याच आरोग्य विम्यामध्ये प्रसुतीसाठी वेटिंग पिरिएड असतो. हा काळ 3 ते 5 वर्षांचा असू शकतो. 25 व्या वयामध्ये आरोग्य विमा घेतल्यास त्याचा फायदा 28 व्या वर्षापासून मिळू शकतो. महत्वाचे म्हणजे प्रसुतीचा खर्च वाचल्य़ास गेल्या तीन वर्षांतील प्रिमियमही त्यातून भरून निघतो. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स