(Image Credit : singaporemotherhood.com)
लहान मुलांचा राग आणि चिडचिडपणा याकडे पालक अनेकदा दुर्लक्ष करतात. अनेकदा पालकांना वाटतं की, ही त्यांची सवय असू शकते. जर तुम्हीही असाच विचार करत असाल तर हे पुढे गंभीर ठरू शकतं. कारण नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, लहान मुलांमध्ये चिडचिडपणा आणि राग व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे येतो. इतकेच नाही तर या रिसर्चनुसार, व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये आक्रामकताही बघायला मिळाली.
Journal of Nutrition मध्ये प्रकाशित या रिसर्चनुसार, ही समस्या ५ वर्षांपेक्षा मोठ्या लहान मुलांमध्ये बघायला मिळते. अभ्यासकांचं असं मत आहे की, व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे, पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावरही प्रभाव पडतो.
लहान मुलांवर रिसर्च
लहान मुलांवर करण्यात आलेल्या या रिसर्चमध्ये प्रायमरी शाळेत शिकणाऱ्या ५ ते १२ वयाच्या ३२०२ मुला-मुलींचा समावेश करण्यात आला होता. या रिसर्चमध्ये मुलांच्या सवयी, त्यांचा अभ्यासाचा, खेळण्याचा आणि आरोग्याचा डेटा एकत्र करण्यात आला होता. यात ब्लड टेस्टच्या माध्यमातून व्हिटॅमिन आणि पोषक तत्वांची कमतरता बघायला मिळाली. रिसर्चच्या परिणामांमध्ये असं आढळलं की, पोषक तत्वांची आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्याने लहान मुलांच्या व्यवहारात बदल येतो.
लहान मुलांमध्ये व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचे कारण
अलिकडच्या काळात व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचे अनेकजण शिकार होत आहेत. यात लहान मुलंही शिकार होत आहेत. याचं मुख्य कारण सूर्यकिरणांपासून दूर राहणे. व्हिटॅमिन डी ची कमतरता शहरी भागातील मुलांमध्ये अधिक बघायला मिळते. कारण त्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळू शकत नाही.
लहान मुलांमध्ये व्हिटॅमिन डी च्या कमतरतेची इतरही काही कारणे आहेत. जीवनशैलीमध्ये बराच बदल झाला आहे. तसेच अलिकडे लहान मुले जंक फूडचं अधिक सेवन करतात. आणि लहान मुलं पोषक तत्व कमी असलेल्या पदार्थांचं सेवनही कमी करतात.
हेल्दी फूड जे व्हिटॅमिन डी चे स्त्रोत आहेत
- सूर्यकिरणासोबत काही खाद्य पदार्थांमध्येही व्हिटॅमिन डी आढळतं. त्यासाठी मुलांच्या आहारात या पदार्थांचा समावेश करावा.
- सर्वात चांगला आणि फायदेशीर व्हिटॅमिन डी चा स्त्रोत म्हणजे दूध हे आहे. लहान मुलांच्या डाएटमध्ये रोज दुधाचा समावेश करावा.
- व्हिटॅमिन डी चा स्त्रोत म्हणून मशरूमही खाऊ शकता. कारण यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी असतात.
- काही फळांच्या ज्यूसमध्येही व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असतं. संत्र्याचा ज्यूस हे व्हिटॅमिन डी चा चांगला स्त्रोत आहे.