अनेक लोक ओम या मंत्राचा जप करत असतात. मनाला शांती वाटावी म्हणून तर काहीजण देवाची प्रार्थना करत असताना ओम नामाचा जप करत असतात. ओम नामाचा जप करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. तुम्हाला वाचून विश्वास बसणार नाही पण ओम नामाचा जम जर तुम्ही योग्यप्रकारे केलात तर आरोग्याला अनेक फायदे मिळतात. एका अभ्यासानुसार जे लोक योग्य पध्दतीने ओमचा जप करतात. ते लोक खूप ताण-तणावमुक्त असल्यासारखं फील करतात. चला तर मग जाणून घेऊया ओम म्हटल्याने शरीराला कोणते फायदे होतात.
अनेक लोक दिवसभर देवाला वंदन करण्यासाठी किंवा देवाप्रती भक्ती व्यक्त करण्यासाठी ओम नमः शिवायचा जप करतात. पण हा जप करत असताना फक्त देवाची भक्तीच नाही तर तुम्ही तुमचं आरोग्य सुद्धा चांगलं ठेवू शकता.
ओम चा उच्चार या ठिकाणी करा
या मंत्राचा उच्चार गर्दीच्या ठिकाणी करू नका. कमी गर्दीच्या ठिकाणी शांत आणि अल्ल्हाददायक ठिकाणी करा. एकाग्रतेने करा. आजूबाजूच्या वातावरणाने लक्ष विचलित होऊ न देता. या नावाचा जप करावा.
मनाला शांती मिळते
योगा आणि मेडिटेशन गुरूंच्या म्हणण्यानुसार ओमचा जप केल्यानंतर आजूबाजूला सकारात्मक भावना निर्माण होत असतात. यामुळे तुम्ही नकारात्मक विचार करण टाळता. त्यामुळे तन-मन आणि आत्म्याला शांती मिळते.
पचनशक्ती मजबूत होते
ओम नावाचा जप केल्यामुळे पोटाचे विकार दूर होतात. आरोग्य उत्तम राहतं. पचनक्रिया चांगली राहते. ज्या लोकांना रात्री झोप न येण्याचा त्रास उद्भवतो. त्यांनी सकाळी ओमचा मंत्र म्हटल्यानंतर त्रास दूर होईल.
ताण-तणावमुक्त राहता येतं.
जेव्हा तुम्ही मंत्राचा जप करत असता. त्यावेळी डोक्यातून राग, भिती अशा भावना दूर होत जातात. मनातून नकारात्मक विचार निघून जातात. शारीरिक आणि मानसिक आरोग्य निट राहण्यासाठी हा ओमच्या मंत्राचा जप फायदेशीर ठरत असतो. सकाळी लवकर उठून जप केल्याने दिवस चांगला जातो. सकाळी शक्य नसल्यास रात्री जप करा.
एकाग्रता वाढते
(image credit-theweek)
ओम नामाचा जप केल्यास मानसिक तणावातून मुक्ती मिळते आणि मन शांत राहत असल्याचं विज्ञानानं देखील मान्य केलंय. एकाग्रता अधिक राहते . तसंच ओम शब्द हा कधीही हळू आवाजात बोलू नये. हळू आवाजात जप केल्यास त्याचा काही फायदा होत नाही. जितक्या जोरात या शब्दाचा उच्चार आणि जप केल्यास तितकाच लाभ होतो आणि शांतीही मिळते.