शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रसन्नतेची गुरुकिल्ली तुमच्याच खिशात आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 15:08 IST

आयुष्य आनंदानं उपभोगायचं असेल, तर ही किल्ली शोधायलाच हवी..

ठळक मुद्देमाणसांचं हसणं दिवसेंदिवस होतंय कमी कमी.ताणतणावांमुळे जगण्याचा दर्जा खालावतोय.प्रसन्न राहिलात तरच मिळेल पॉझिटिव्ह एनर्जी

- मयूर पठाडेरोजच्या कामाच्या धबडग्यात एनर्जी आणायची तरी कुठून?.. बरं हे काही एका वेळेचं नाही, रोजचाच झगडा आहे तो.. वेळ पुरत नाही.. कामाचा रगाडा तर रोजचाच. कितीही उरकलं तरी उरकत नाही..रोजची टेन्शन्स तरी किती? त्याचा तुमच्या शरीर, मनावर परिणाम होतोच. त्याचा आता अतिरेक होत चालला आहे, असे अभ्यासकांचं निरीक्षण आहे. त्यासाठी मनाला, स्वत:ला प्रसन्न ठेवण्याचे उपाय प्रत्येकानं शोधले पाहिजेत असा सल्लाही या अभ्यासकांनी दिला आहे.अलीकडच्या काळात यासंदर्भात अनेक अभ्यास प्रसिद्ध झाले. त्यातील अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या अमेरिका आणि आॅस्ट्रेलियातील अभ्यास सांगतो की माणसांचं हसणं दिवसेंदिवस कमी झालं आहे. त्याच्या आयुष्यातील प्रसन्नता कमी कमी होते आहे. अरोग्य विषयक नवनवीन संशोधनांमुळे माणसांचं आयुष्य भलेही वाढलं असेल, पण त्याचा दर्जा मात्र सातत्यानं खालावतोच आहे. हा दर्जा सुधारण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रसन्न राहाण्याची कला शिकून घेणं. प्रसन्नतेची ही गुरुकिल्लीच तुमचं आयुष्य सुखी, समाधानी करील. नाहीतर ताणतणावांच्या घेºयात आयुष्याचा खरा उपभोग तुम्हाला घेताच येणार नाही.त्यासाठी या अभ्यासकांनी काही उपायही सुचवले आहेत. ते म्हणजे कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीनं बघण्याची सवय आपण लावली पाहिजे. तुमच्या आयुष्यात कितीही वाईट किंवा तुम्हाला दु:ख देणारी जरी गोष्ट घडली, तरी त्यातही चांगली गोष्ट शोधा, तुमच्या आयुष्यातल्या इतर चांगल्या गोष्टींकडे बघा आणि त्यावर आपलं लक्ष केंद्रित करा. ही गोष्ट अवघड आह, पण अशक्यही नाही.तुम्ही कोणत्याही इझमचे असा, कोणत्याही प्रवृत्तीचे असा, दैववादी असा किंवा नसा.. तुमच्या आयुष्यात घडणाºया गोष्टींना भले कोणतंही नाव द्या.. जे काही घडतं ते निसर्गाच्या इच्छेनं होतं म्हणा, देवाच्या इच्छेनं होतं म्हणा, या चराचरात भरलेल्या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह प्रेरणेनं होतं म्हणा किंवा आपणच या साºया गोष्टींना कारणीभूत आहोत असं म्हणा.. पण चांगल्या गोष्टींकडे बघा, सकारात्मक दृष्टी अंगी बानवा.. प्रसन्नतेची गुरुकिल्ली तुमच्याचकडे आहे, ती शोधा.. त्यातूनच तुमच्या जगण्याला आणि आयुष्याला अर्थ प्राप्त होईल.. असा सल्ला अभ्यासकांनी दिला आहे. त्याकडे आपणही सकारात्मकतेनं पाहायलाच हवं.