शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus चा धोका कमी करण्यासाठी तोंडाच्या स्वच्छतेवर द्या अधिक लक्ष, रिसर्चमधून दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 10:01 IST

Coronavirus : याचे पुरावे सापडले आहे की, तोंड स्वच्छ करण्यासाठी उपलब्ध माउथवॉश Covid-19 साठी जबाबदार सार्स-सीओवी-२ ला निष्क्रिय करण्यासाठी प्रभावी आहे.

जर कोरोनापासून (Coronavrus) बचाव करायचा असेल तर तोंडाच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या वैज्ञानिकांनी सांगितले की, व्हायरल तोंडातून फुप्फुसापर्यंत पोहोचण्याचा धोका कमी करण्यासाठी तोंडाच्या स्वच्छतेसारखा साधारण उपाय फार फायदेशीर ठरू शकतो. असा दावा एका रिसर्चमधून करण्यात आला आहे. जर्नल ऑफ ओरल मेडिसिन अॅन्ड डेंटल रिसर्चमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, याचे पुरावे सापडले आहे की, तोंड स्वच्छ करण्यासाठी उपलब्ध माउथवॉश (Mouthwash) Covid-19 साठी जबाबदार सार्स-सीओवी-२ ला निष्क्रिय करण्यासाठी प्रभावी आहे.

...म्हणून गरजेची आहे स्वच्छता

रिसर्च दरम्यान वैज्ञानिकांनी आढळून आले की, कोरोना व्हायरस लाळेच्या माध्यमातून फुप्फुसापर्यंत जाऊ शकतो. जर तुम्हाला हिरड्यांची काही समस्या असेल तर यात व्हायरस थेट तोंडातून रक्तप्रवाहात पोहोचतो. वैज्ञानिकांनुसार, पुराव्यातून समजून येतं की,  फुप्फुसाच्या रक्तवाहिन्या सुरूवातीला COVID-19 फुप्फुसाच्या आजाराने प्रभावित होते. आणि लाळेत व्हायरसचं प्रमाण अधिक राहतं. दातांच्या आजूबाजूला सूज असेल तर मृत्युचा धोका वाढतो. त्यामुळे दातांची आणि तोंडाची स्वच्छता महत्वाची ठरते. (हे पण वाचा : coronavirus: कोरोनावरील उपचारातील या घरगुती उपायांमुळे अजून वाढतो धोका, डॉक्टरांनी दिला असा इशारा)

धोका कसा टाळाल?

रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, दातांवर जमा झालेला अन्न कणांचा थर आणि हिरड्यांच्या आजूबाजूला सूज आल्याने सार्स-सीओवी-२ व्हायरस फुप्फुसात पोहोचण्याचा आणि जास्त गंभीर संक्रमण करण्याची शक्यता जास्त वाढते. तज्ज्ञ सांगतात की, तोंडाची स्वच्छता एक चांगला जीवन रक्षक उपाय होऊ शकतो. 

Mouthwash नसेल तर मिठाचं पाणीही चालेल

ब्रिटनच्या बर्मिंघम विश्वविद्यालयातील प्रोफेसर आणि या रिसर्चचे सह-लेखक इयान चॅपल म्हणाले की, या मॉडलने आपल्याला हे समजून घेण्यास मदत मिळू शकते की, का काही लोकांना Covid-19 ने फुप्फुसांचा आजार होतो आणि काही लोकांना होत नाही. रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, दातांना काळजीपूर्वक ब्रशने स्वच्छ करा. दातांमधील घाण स्वच्छ करा. माउथवॉशचा वापर करून किंवा मिठाच्या पाण्याने गुरळा करून तुम्ही हिरड्यांवरील सूज कमी करू शकता. ज्याने लाळेतील व्हायरसची सांद्रता कमी करण्यास मदत मिळू शकते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सResearchसंशोधन