शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

वारंवार डोके खाजवताय; हे कारण तर नाही ना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 11:54 IST

डोक्याला खाज सुटली की, कशातच मन लागत नाही. लक्ष विचलित होते, ज्यामुळे आपले काम अर्धवट राहते.

Health Tips : केसांमध्ये कोंडा, उवा, स्कॅल्प, घाम, त्वचा कोरडी, केमिकलयुक्त शॅम्पूचा वापर, अशा अनेक कारणांमुळे डोक्यावर खाज सुटते. काहीवेळेला खाजवून स्काल्पवरील त्वचा रखरखीत होते. समोरचा व्यक्ती आपल्याविषयी काय विचार करेल,असा प्रश्न पडतो. डोक्याला खाज सुटली की, कशातच मन लागत नाही. लक्ष विचलित होते, ज्यामुळे आपले काम अर्धवट राहते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 

घाम येणे: प्रदूषणामुळे नेहमी डोक्यावर धूळ साचते. सध्या हिवाळा सुरू आहे. ज्यामुळे रात्री झोपताना टाळूवर प्रचंड खाज सुटते.

शरीराच्या तापमानात बदल:  सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री, शरीराचे तापमान नेहमी बदलत राहते. अनेक वेळा काही लोकांच्या शरीराचे तापमान रात्रीच्या वेळी वाढते, त्यामुळे त्वचेवर खाज सुटते.

रात्रीच्या वेळी त्वचेवर खाज सुटते :

१)  या समस्येला नॉक्टर्नल प्रुरिटस म्हणतात. ज्याला ही समस्या आहे, त्याला रात्रीच्या वेळी त्वचेवर खाज सुटते.

२) ही खाज शरीराच्या कोणत्याही भागावर उठू शकते. टाळू नेहमीच उबदार असल्यामुळे तिथे जास्त खाज सुटते. 

३) आपल्या शरीराला पोषक आहार न मिळाल्याने सुद्धा डोक्यात खाज येते. 

हार्मोनल असंतुलन: रात्रीच्यावेळी, एंटी इंफ्लामेटरी हार्मोनची पातळी कमी होत जाते. त्यामुळे त्वचेवर सूज येते आणि खाज सुटू लागते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी आंबट पदार्थ खाऊ नयेत.

हे करा उपाय :

१) खोबरेल तेलात ऑलिव्ह ऑईल मिसळून गरम करा. हे तेल रात्री झोपण्यापूर्वी लावून मसाज करा.

२) टाळूला गुलाबपाणीही लावू शकता. गुलाब पाण्यात नैसर्गिक मॉइश्चरायझर असते. 

३) गुलाबजल लावून टाळूवर हलका मसाज करा. जर आपल्याला स्ट्रेस असेल तर रात्री झोपण्यापूर्वी ध्यान करा.

४) पलंग स्वच्छ ठेवा, दर ३ ते ४ दिवसांनी उशाचे कव्हर बदला.

५) आठवड्यातून  दोनदा केस धुवावेत, कारण टाळूवर घाण साचल्यावर केसांना खाज सुटते.

६) केसांमध्ये वारंवार कोंडा होत असेल तर, तज्ज्ञांच्या सल्ल्याने अँटी डँड्रफ शॅम्पू आणि घरगुती उपाय वापरून पाहावे.

तेलाचा वापर : तुम्ही सुगंधित, कोणतेही ब्रँडेड तेल न वापरल्यामुळे ही डोक्यात खाज येते, अशा  तेलाचे रिएक्शन झाल्याने ही डोक्यात खाज येते. अशी अनेक कारणे आपल्या डोक्यात खाज येण्याची आहेत.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHair Care Tipsकेसांची काळजी