शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

हार्ट अटॅक कधी येणार हे 30 वर्षे आधीच कळणार, अमेरिकन डॉक्टरांच्या संशोधनामुळे अनेकांचे प्राण वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 06:18 IST

Health News: एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक कधी येईल, याचा अंदाज लावणे आतापर्यंत सर्वांत कठीण होते. मात्र, आता संशोधकांनी अशी एक पद्धत शोधली असून, यामध्ये हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्याचा धोका ३० वर्षे आधीच कळण्यास मदत होणार आहे.

लंडन - एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक कधी येईल, याचा अंदाज लावणे आतापर्यंत सर्वांत कठीण होते. मात्र, आता संशोधकांनी अशी एक पद्धत शोधली असून, यामध्ये हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्याचा धोका ३० वर्षे आधीच कळण्यास मदत होणार आहे. अमेरिकन डॉक्टरांनी हे संशोधन केले असून, यामुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे.

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार ही एक प्रकारची रक्त चाचणी असून, यात तीन मार्कर तपासले जातात. हृदयरोगाचे डॉक्टर आतापर्यंत, चाचणीसाठी फक्त एका मार्करवर अवलंबून होते, त्याला एलडीएल कोलेस्ट्रॉल किंवा बॅड कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते. एलडीएल कोलेस्टेरॉल धमन्यांच्या भिंतींमध्ये जमा होते. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद आणि कडक होतात. ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्थितीमुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

३० वर्षं चालले संशोधनसंशोधनाचे प्रमुख लेखक डॉ. पॉल रिडकर म्हणाले की, एलडीएल कोलेस्टेरॉल चाचणी एखाद्याचे हृदय किती निरोगी आहे हे तपासत नाही.  तीन दशकांच्या संशोधनादरम्यान डॉक्टरांनी आणखी दोन शोध बायोमार्कर सी-रिॲक्टिव्ह प्रोटीन (सीआरपी) आणि लिपोप्रोटीन्स जोडले.  यात सीआरपी रक्तवाहिन्यांमधील सूज दिसते तर उच्च लिपोप्रोटीन पातळी भविष्यातील हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका दाखवते. 

कुणाला धोका अधिक?- संशोधनात ३०,००० अमेरिकन महिलांचा समावेश करण्यात आला होता.- ज्या महिलांमध्ये उच्च एलडीएल कोलेस्ट्रॉल व्यतिरिक्त सीआरपी आणि लिपोप्रोटीनची पातळी जास्त होती त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त आढळून आला. - नवीन चाचणी हृदयविकाराचा अंदाज लावण्यासाठी गेमचेंजर ठरू शकते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHealthआरोग्य