शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

'घरातून मासिक पाळी व्यवस्थापन शिकविणे गरजेचे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 06:39 IST

मासिक पाळी व्यवस्थापनाचे धडे घरांतून मिळणे गरजेचे असल्याची बाब आस्क फाउंडेशनच्या अवनी अगस्ती यांनी अधोरेखित केली. 

मुंबई : मुंबईतील शाळा-समुदायांमध्ये आरोग्यविषयक समस्यांवर जनजागृतीपर उपक्रम राबवित असताना मासिक पाळीविषयी असलेली उदासीनता अधोरेखित होते. त्यामुळे मासिक पाळी व्यवस्थापनाचे धडे घरांतून मिळणे गरजेचे असल्याची बाब आस्क फाउंडेशनच्या अवनी अगस्ती यांनी अधोरेखित केली आहे. आजही मुंबईसारख्या मेट्रो शहरांत मासिक पाळीविषयीचे गैरसमज, अंधश्रद्धा आहेत. त्यामुळे मुली-महिलांच्या आरोग्यावर होणाऱ्या दूरगामी परिणामांविषयी बोलले जात नाही, याची खंतही अगस्ती यांनी व्यक्त केली.

मागील काही वर्षांपासून शहर, उपनगरांतील विविध समुदाय आणि शाळांमध्ये अवनी अगस्ती फाउंडेशन २४ या संस्थेच्या माध्यमातून आरोग्यविषयक उपक्रम आयोजित केले जातात. त्यात मासिक पाळीविषयी माहिती, त्या काळातील स्वच्छता, लैंगिक शिक्षण, रजोनिवृत्ती, सॅनिटरी पॅडचे वितरण यावर प्रकाशझोत टाकण्यात येतो. यासाठी संस्थेचे स्वयंसेवक वैद्यकीय तज्ज्ञांच्या चमूसह विविध वस्ती-समुदायांना भेट देत, याविषयी जनजागृती करण्यात येते.या विषयांबाबत अगदी सामान्यांची मानसिकता केंद्रस्थानी ठेवून हा बदल घडविण्यावर भर देत असल्याचे अगस्ती यांनी अधोरेखित केले.

असे चालते कामव्यवस्थापन प्रशिक्षण सत्रात मासिक पाळीविषयी जागृती निर्माण करणे, पाळीच्या दरम्यान उद्भवलेल्या आव्हानांना हाताळणे, त्या दिवसातील स्वच्छता व आरोग्याचे प्रश्न योग्य पद्धतीने हाताळणे, अंधश्रद्धा दूर करणे व सल्ला या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात येते.  प्रशिक्षणाच्या म्यान मुली-मातांना मार्गदर्शन करण्यावर भर राहतो. पण त्यासाठी सुविधा आवश्यक ठरतात. म्हणून प्रत्येक शाळा – वाडी-वस्त्यांमधील स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृहे परिपूर्ण असण्यावरही कटाक्ष आहे.   

व्हॅनद्वारे करण्यात येते वैद्यकीय तपासणीशहर उपनगरातील भाभा, कूपर रुग्णालयांतील तज्ज्ञांच्या सहकार्याने संस्थेद्वारे मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून विविध परिसरांत वैद्यकीय तपासण्या - शिबिरे घेण्यात येतात. यावेळी मुली-महिलांच्या प्राथमिक आरोग्य तपासण्या, त्याचप्रमाणे कर्करोग, मौखिक आरोग्यविषयक तपासण्या केल्या जातात. 

या तपासण्यांदरम्यानही अनेकदा मुले-मुली, महिला पुढाकार घेताना कचरत असल्याचे दिसून आले. मात्र, संवाद-शंकांचे निरसन केल्यानंतर मिळणारा प्रतिसाद समाधान देणारा असतो, अशी भावना अगस्ती यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Healthआरोग्य