शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदींनी शेअर केला 'या' खास आसनाचा VIDEO; वेट लॉस, हृदय निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी! आणखीही बरेच फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 16:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योगासने करण्याची पद्धत आणि त्यांचे फायदे शेअर केले आहेत.

देशात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या (२१ जून) तयारीला सुरुवात झाली आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योगासने करण्याची पद्धत आणि त्यांचे फायदे शेअर केले आहेत. त्यांनी आज शशांकासनासंदर्भात माहिती शेअर केली आहे. यालाच रॅबिट पोझही म्हटले जाते. तर जाणून घेऊयात, शशांकासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे...

शशांकासन करण्याची योग्य पद्धत -- शशांकासनाला रॅबिट पोज असेही म्हटले जाते. कारण यात शरीराचा आकार एखाद्या सशा प्रमाणे होतो.- हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम वज्रासनाच्या स्थितीत बसा. अर्थ, आपले पाय गुडघ्यात वाकवा आणि नंतर हीप तळव्यावर टेकवून बसा.- आता दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवा- आता दोन्ही गुडघे शक्य तेवढे पसरवा.- यावेळी, पायांचे अंगढे एकमेकांना स्पर्श केलेले असावेत.- आता तळवे दोन्ही गुडघ्यांच्या मधे जमिनीवर ठेवा आणि श्वास सोडा.- आता हात समोरच्या बाजूला सरकवा आणि तोंड समोर ठेवा.- अशा स्थितीत चेहरा समोर आणि हनुवटी जमिनीवर असावी. तसेच हात एका रेषेत समोर असावेत.- काही वेळ याच स्थितीत राहा आरामात राहा. तसेच सामान्य पणे श्वास घ्या आणि सोडा.- यानंतर सामान्य वज्रासनाच्या स्थितीत या आणि पाय एका बाजूला करून सरळ करा. 

शशांकासनाचे फायदे - - शशांकासन रोज केल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येत आराम मिळतो आणि पचनक्रिया सुधारते.- ज्या लोकांना कंबरेच्या वरच्या भागात त्रास होतो अथवा पाठदुखीचा त्रास होतो. त्यांच्यासाठी हे आसन अत्यंत फायदेशीर आहे.- तणाव दूर करण्यासाठी आणि रागावर नियंत्रण ठेवण्यासाठीही फायद्याचे आहे शशांकासन.

या लोकांनी करू नये? - उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी हे आसन टाळावे.- संधिवात किंवा गुडघेदुखीचा त्रास असलेल्यांनीही शशांकासन करणे टाळावे.- ज्या लोकांना कंबर आणि पाठदुखीचा अधिक त्रास होतो. त्यांनीही हे आसन करणे टाळावे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीYogaयोगासने प्रकार व फायदेInternational Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिन