शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
2
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
3
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
4
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
5
बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
6
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
7
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
8
शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
9
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
10
IPL 2025 Auction : ‘छप्पर फाड’ कमाई करण्यासाठी परदेशी खेळाडूनं खेळला असा डाव; सगळेच झाले थक्क!
11
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
12
नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?
13
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
14
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
15
उत्तर प्रदेशसह या ६ राज्यांमध्ये SIR साठीची मुदत वाढवली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय  
16
"रोहित शर्मा मैदानात जेव्हा 'तसा' वागतो, ते खूप विचित्र वाटतं"; यशस्वी जैस्वाल अखेर बोललाच
17
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
18
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
19
थंडीत फ्रीज बंद करणं पडू शकतं महागात; वीज वाचवण्याच्या नादात करू नका 'ही' चूक
20
Technology: सावधान! तुमच्या फोन स्क्रीनवरील 'हे' तीन रंगीत ठिपके देतात हॅकिंगची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

हृदयाबद्दल 'अशा' इंटरेस्टिंग गोष्टी ज्या तुम्हाला माहीत नसतील, वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 16:10 IST

हृदय हा शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव असतो.

हृदय हा शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव असतो. पण रोज अनेक चुकीच्या गोष्टी आपण वारंवार करत असतो. त्यामुळे हृदयाला धोका सुद्धा असू शकतो. आज आम्ही तुम्हाला हृदयाशी निगडीत काही गोष्टी सांगणार आहोत. ज्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही योग्य प्रकारे काळजी घेऊ शकता.  चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत या गोष्टी.

हृद्याचे ठोके किती वेळा होतात

(image credit-gfycat)

जन्म झाल्यानंतर मृत्यू होईपर्यंत हृद्याचे ठोके सुरू असतात. आपल्या हृदयात ४ चेंबर असतात.  त्यावर ४ वॉल्व असतात. हे वॉल्वज उघडतात आणि बंद होतात. जेव्हा या वॉल्वसची उघड झाप होत असते. त्यावेळी तेव्हा हृदयाच्या ठोक्यांचा आवाज येत असतो.  एका मिनिटात ७२ वेळा हृदयाचे ठोके होत असतात. तसं पाहायला गेलं तर रोजचं जीवन जगताना दिवसात १ लाखापेक्षा अधिक वेळा हद्याचे ठोके होत असतात. 

किती ब्लड पंप होतं

(image credit- ashok sahani)

तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही पण तुमचं हृदय तुमची शारीरिक क्षमता लक्षात घेऊन एका मिनिटात ५ ते ३ लिटरपर्यंत ब्लड पंप होत असतं. यानुसार दिवसातून ७५०० लिटर पेक्षा जास्त रक्त तुमच्या  हृद्याद्वारे पंप केलं जातं. हृद्याच्या पंप होण्याच्या क्रियेमुळे आपण जिवंत असतो. पंप केल्या जात असलेल्या रक्तात पोषक तत्व आणि ऑक्सीजन मिसळलेला असतो.  जे सेल्सकडे जातं. त्यानंतर उरलेले घटक किडनीकडे पाठवले जातात. ज्या ठिकाणीहून  रक्त फिल्टर होत असतं. ( हे पण वाचा-पोटात सतत जळजळ होत असेल तर 'या' घरगुती उपायांनी मिळेल आराम)

हृदय एकटं सुद्धा जीवंत राहू शकंत

(image credit- pinterest)

ही खूप मजेशीर गोष्ट आहे पण तुमच्या हृदयाला शरीरापासून वेगळं केलं तर शरीराचं कार्य थांबेल आणि तुमचा मृत्यू होईल. पण हृदयाला जर तुमच्या शरीरापासून लांब केलं तरी सुद्धा त्याचे ठोके सुरूच राहतील. जगातील सर्वाधीक लोक कार्डीओवॅस्कुलर आजारांनी मरतात. त्यात सगळ्यात  जास्त संख्या हार्ट अटॅक ने मृत्यू झालेल्या लोकांची आहे. वयस्कर व्यक्तीचे हार्ट २५० ते ३५० ग्रामचे असते. काही केसेस मध्ये हेच वजन ५०० ग्राम सुद्धा असू शकतं. 

हसणं हृदयासाठी चांगलं असतं

(image credit-hydrusenglishcourse)

हृदयाला चांगलं ठेवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का जर तुम्हाला तुमचं हृदय चांगलं ठेवायचं असेल तर हसणं हा सुद्धा एका प्रकारचा व्यायाम आहे. एका अभ्यासानुसार हसल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह २० टक्क्यांनी वाढतो.  हसल्यामुळे ताण-तणाव कमी होतो.  रोगप्रतिकारकशक्ती वाढते. ( हे पण वाचा-पायांची दुर्गंधी येण्याचं मुख्य कारण आणि समस्या दूर करण्याचे योग्य उपाय!)

 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHeart Diseaseहृदयरोग