'या' गोष्टीमुळे होऊ शकतो हार्ट स्ट्रोकचा धोका, जाणून घ्या कारण...  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 10:51 AM2019-08-21T10:51:25+5:302019-08-21T10:56:15+5:30

आजकाल धावपळ आणि तणावपूर्ण लाइफस्टाईलमुळे वेगवेगळे हृदयरोग होणे सामान्य बाब झाली आहे.

Insomnia is linked to increased risk of heart faliure and strokes | 'या' गोष्टीमुळे होऊ शकतो हार्ट स्ट्रोकचा धोका, जाणून घ्या कारण...  

'या' गोष्टीमुळे होऊ शकतो हार्ट स्ट्रोकचा धोका, जाणून घ्या कारण...  

googlenewsNext

(Image Credit : www.health.harvard.edu)

आजकाल धावपळ आणि तणावपूर्ण लाइफस्टाईलमुळे वेगवेगळे हृदयरोग होणे सामान्य बाब झाली आहे. कमी वयातही लोक हार्ट फेलचे आणि हार्ट स्ट्रोकचे शिकार होत आहेत. तसेच तणाव असलेल्या दिनचर्येत लोक झोप न येण्याच्या समस्येशी सुद्धा लढत आहेत. पण ही समस्या तुमच्यासाठी जीवघेणी ठरू शकते. कारण एका रिसर्चमधून समोर आले आहे की, झोप न येण्याच्या समस्येमुळे हार्ट फेल आणि हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.

(Image Credit : sg.news.yahoo.com)

हा रिसर्च अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या रिसर्चमध्ये झोप न येणे, हार्ट फेल आणि स्ट्रोक यांच कनेक्शन आढळून आलं आहे. याआधीही काही रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, साधारण ३० टक्के लोकसंख्या झोप न येण्याच्या समस्येचे आणि हृदयरोगाच्या समस्येचे शिकार आहेत. या रिसर्च हे नव्हतं पाहिलं गेलं की, या दोन गोष्टींचं काही कनेक्शन आहे का.

(Image Credit : www.health.harvard.edu)

या रिसर्चमध्ये अभ्यासकांना आढळलं की, झोप न येण्याचे अनुवांशिक प्रकार कोरोनरी आर्टरी डिजीज, हार्ट फेल आणि हार्ट स्ट्रोकशी जुळलेले होते. रिसर्चच्या मुख्य लेखिका सूजाना लार्सन यांनी सांगितले की, 'गरजेचं आहे की, लोकांनी झोप न येण्याचं कारण जाणून घ्यावं आणि समस्या दूर करण्याचा प्रयत्न करावा. झोप न येण्याची समस्या ही सवयींमध्ये बदल करून आणि तणाव दूर करूनही केली जाऊ शकते.

(Image Credit : www.sciencedaily.com)

दरम्यान, या रिसर्चची एक कमजोरीही होती. ती म्हणजे या रिसर्चमध्ये झोप न येण्याच्या जेनेटिक व्हेरिएंटचा समावेश करण्यात आला होता. लार्सन म्हणाल्या की, हे जाणून घेणं शक्य नव्हतं की, ज्या लोकांना हृदयरोग आहे. त्या सर्वांनाच झोप न येण्याची समस्या आहे किंवा नाही?

Web Title: Insomnia is linked to increased risk of heart faliure and strokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.