शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धावा आणि निर्णय क्षमता वाढवा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2016 17:40 IST

रोज धावल्याने शरीर सुदृढ होते हे आपणास माहितच आहे. मात्र धावण्याच्या व्यायामाने निर्णय क्षमतेतही वाढ होते हे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

रोज धावल्याने शरीर सुदृढ होते हे आपणास माहितच आहे. मात्र धावण्याच्या व्यायामाने निर्णय क्षमतेतही वाढ होते हे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानूसार दररोज धावण्याचा व्यायाम करण्यामुळे मेंदूला चालना मिळते. तसेच त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढून महत्त्वाचे निर्णय घेण्याची क्षमता वाढत असल्याचे जाहीर केले आहे. संशोधनात नियमित धावण्याचा व्यायाम करणाऱ्या आणि कोणताही शारीरिक व्यायाम न करणाऱ्या तरुणांचा अभ्यास करण्यात आला आहे. नियमित धावण्याचा व्यायाम केल्यामुळे अल्झायमर तसेच मेंदूशी संबंधित आजार दूर होण्यास काही प्रमाणात मदत होत असते. याचे काही परिणाम कालांतरानेही दिसतात असे संशोधकांनी म्हटले आहे. हे संशोधन ह्युमन न्यूरोसायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रामुख्याने तरुणांमध्ये धावण्यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर होणारा परिणाम संशोधकांनी यामध्ये अभ्यासला आहे. यासाठी त्यांनी मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (एमआरआय) तंत्रज्ञानाचा वापर केला. संशोधनात सहभागी करून घेण्यात आलेल्या तरुणांचे वय १८ ते २५ या दरम्यान होते.रोज धावण्याचा व्यायाम करण्यामुळे मेंदूचा शरीराशी असणारा संपर्क वाढतो अथवा मेंदू अधिक कार्यशील होण्यास मदत होते. धावण्यामुळे समोरील भागात असणारा मेंदू यामुळे अधिक कार्यशील होऊन निर्णय घेण्याची क्षमता वाढणे, योग्य नियोजन करणे, काम करत असताना लक्ष सतत केंद्रित करण्यास मदत होत असल्याचे अभ्यासात समोर आले आहे.