शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

आयुष्यभर तरूण आणि सुंदर दिसायचं असेल तर 14 नियम काटेकोर पाळाचं

By admin | Updated: May 31, 2017 18:32 IST

जीवनात अशा 14 गोष्टी आहेत ज्या आपण नियमित पाळल्या तर वयाचा आकडा कोणताही असो आपण कायम तरूणच दिसू हे नक्की!

- मृण्मयी पगारेआयुष्यभर तरूणच दिसता आलं तर? ही तर प्रत्येकाचीच इच्छा. पण ती पूर्ण करणं हे कुठे आपल्या हातात आहे? आपल्याला कितीही तरूण दिसावं असं वाटत असलं तरी काळ आपलं काम करतोच. न थांबता टिकटिकणारं घड्याळ, रोज उगवणारा सूर्य थोडीच कोणाला धरून ठेवता येतो? मग कसं कोणी कायम तरूणच दिसेल?असं वाटत असलं तरी जीवनात अशा 14 गोष्टी आहेत ज्या आपण नियमित पाळल्या तर वयाचा आकडा कोणताही असो आपण कायम तरूणच दिसू हे नक्की!आणि अशा नैसर्गिक तारूण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची किंवा ढीगभर कॉस्मेटिक्स आणि लोशन वापरण्याची गरज नाही. रोजच्या जगण्यात 14 नियम पाळा आणि कायम तरूण दिसा!कायम तरूण ठेवणारे 14 नियम

 

1) आपलं वय सगळ्यात आधी दाखवतात ते आपले केस. केस कायम मऊ, मुलायम आणि काळेभोर दिसावे असं वाटत असेल तर आधी केसांना तापवणं थांबवायला हवं. ड्रायरनं केस कोरडे करणं, केस कुरळे करण्यासाठी कर्लिंग आर्यन, मशिननं केस स्टे्रट करणं हे प्रकार केसांच्या बाबतीत करू नये. या गोष्टी केसांपासून चार हात दूर ठेवल्या तर केसांचं आरोग्य कायम चांगलं राहातं. 2) SPF हा घटक असलेलं क्रीम चेहेऱ्यासाठी नियमित वापरावं. SPF या घटकामुळे त्वचेला आवश्यक ते पोषण मिळतं. आणि अती नील किरणांपासून त्वचेची रक्षा होते. आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा SPF असलेलं क्रीम वापरणाऱ्यांच्या चेहेऱ्यावर सुरकुत्या पडत नाही असं अभ्यास सांगतो. SPF 30 डर्मेटॉलॉजिस्टचं मान्यताप्राप्त क्रीम आहे. 3) हातापायांची त्वचाही वयाबद्दल खूप काही सांगून जाते. म्हणूनच हातापायाच्या त्वचेला न चुकता मॉश्चरायझर मिळणं गरजेचं असतं. तरचं हातापायाच्या त्वचेचा मऊपणा आणि चमक टिकून राहाते. रोज सकाळी आंघोळीनंतर मॉश्चरायझर लावणं म्हणूनच गरजेचं आहे. डर्मेटॉलॉजिस्टनं SPF 30 मॉश्चरायझर वापरण्याचा आग्रह केला आहे.

 

           

 

4) दातांना डाग पाडणारे अन्न्नपदार्थ, पेयं सेवन करू नये. डार्क चॉकलेट, हॉट चॉकलेट, अति थंड पेयं, सॉसेस, सोया सॉसेस यांचं अति प्रमाणातलं सेवन दातांचं आरोग्य खराब करतं. अति प्रमाणात रेड वाइन पिणं, कॉफी घेणं या सवयी दात खराब करतात. म्हणून त्यांचं सेवन थांबवावं. 5) अमेरिकन सोसायटी आॅफ प्लॅस्टिक सर्जन यांनी केलेल्या अभ्यासानुसार नुसता चेहरा नाही तर बोटांची नखंही तुमचं वय दाखवतं. नखं कायम सुंदर दिसण्यासाठी त्यांना चांगल्या प्रतीची नेलपॉलिश नियमित लावावी. 6) व्यायामानं शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. त्वचेच्या आरोग्यासाठी तर सुदृढ रक्तप्रवाह कायमच महत्त्वाचा असतो. व्यायामानं रक्तप्रवाहासोबतच शरीराचा बांधाही कायम सुडौल राहतो. आणि तुम्ही जेव्हा सुडौल दिसता तेव्हा आपोआपच तुम्ही कोणत्याही वयात सुंदरच दिसता. म्हणूनच रोज 30 मीनिटं व्यायाम गरजेचा आहे.

 

      

 

7) आहारातल्या मीठाकडे कायम लक्ष असू द्यावं. अती खारट पदार्थ खाऊ नये. मीठामुळे शरीरात पाणी साचून राहातं. आणि त्यामुळे शरीरावर सूज दिसते. अति मीठामुळे आपण लवकर वयस्कर दिसतो. 8) कायम तरूण आणि छान दिसायचं असेल तर स्मार्ट फोन जरा बेतानंच वापरावा. अति स्मार्ट फोनचा वापर आपलं बॉडी पोश्चर खराब करतं. स्मार्ट फोन पाहताना, हाताळताना मान खाली घातलेली असते. आणि जितक्या वेळ फोन वापराल तेवढावेळ ती खाली असते. एकतर यामुळे मानेचे आजार उदभवतात आणि मानेभोवती वळ्या पडून मानेचं सौंदर्य लय पावतं. त्यामुळे स्मार्ट फोन कमी वापरलेला बरा. आणि जेव्हा तो वापरू तेव्हा तो आरशासारखा चेहेऱ्यासमोर धरून वापरावा.

 

9) तोंडातले दात जर लवकर खराब झाले तर तुम्ही वयानं कितीही तरूण असला तरी तुम्ही तरूण मात्र दिसत नाही. यासाठी दातांचं आरोग्य चांगलं ठेवणं आवश्यक आहे. माऊथवॉशनं तोड धुणं ही चांगली सवय आहे. त्यामुळे दात कायम चांगले राहतात. दातात अडकलेले कण माऊथवॉश वापरल्यानं वेळीच निघून जातात. त्यामुळे दात किडत नाही. हिरड्या खराब होत नाही. यासाठी अल्कोहोल फ्री माऊथवॉशनं खुळुखुळु गुळण्या कराव्यात. 10) वयपरत्वे डोक्यावरचे केस कमी होतात. पण हे अर्धसत्य आहे. तुमच्या आहारात जर प्रोटिनचं प्रमाण योग्य असेल तर वय वाढलं तरी डोक्यावरील केस दाट आणि मजबूत राहतात. आपल्या आहारात नियमित प्रोटीन असले तरी केसांची निर्मिती चांगली होते. म्हणूनच रोजच्या आहारात 46 ग्रॅम प्रोटिन गरजेचं मानलं जातं. 11) ओल्या केसांची निगा जर नीट घेतली नाही तरीही केस खराब होवून ते वयाच्या फार आधीच पातळ होतात. त्यामुळे ओले केस कंगव्यानं खराखरा विंचरू नये. 12) हिरव्या भाज्या या नैसर्गिक टूथब्रशचं काम करतात. हिरव्या भाज्या खाल्ल्यानं दात कायम स्वच्छ राहातात. पालक, लेट्यूस, ब्रोकोली, मेथी, तांदुळका यासारख्या हिरव्या भाज्यांमुळे त्वचेचा पोत आणि कांती सुधारते. वय वाढलं तरी त्वचा ही चमकत राहाते.

 

     13) ताणाचा परिणाम जेवढा मनावर होतो तितकाच तो शरीरावरही होतो. ताण असला की तो आधी चेहेऱ्यावर दिसतो. म्हणून कायम अतिताण घेतला तर चेहेऱ्यावर सुरकुत्या पडतात. चेहेरा काळवंडतो. डोळ्याखाली काळी वर्तुळं येतात. म्हणूनच कायम उत्साही राहून स्वत:ला तणावमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करावा. 14) पुरेशी झोप ही शरीर आणि मन दोन्हीसाठी आवश्यक असते. झोपेदरम्यान शरीरात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टे्रॉन या दोन संप्रेरकांची निर्मिती मुबलक होत असते. झोप जर पुरेशी मिळाली नाही तर ही निर्मिती खुंटते. त्यामुळे संप्रेरकांमध्ये असंतुलन ( हार्मोनल इनबॅलन्स) निर्माण होतं. या संप्रेरकांमुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि शरीर आणि मन उत्साही राहातं. त्यामुळे पुरेशी झोप आवश्यक असते. रात्री उशिरापर्यंत टी.व्ही पाहणं, कॉफी पिणं असं करून आलेली झोप घालवण्यापेक्षा रोज रात्री कपभर गरम दुधात मध मिसळून ते प्यायल्यास शांत झोप लागते. पुरेशी आणि शांत झोप यामुळे आयुष्यातली वर्ष तर वाढतातंच शिवाय आयुष्यभर तेज आणि तरतरीतपणाही मिळतो.