शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

पुरुषांसाठी आलं गर्भनिरोधक इंजेक्शन; ICMR च्या ७ वर्षाच्या प्रयत्नांना मोठं यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 09:34 IST

अभ्यासाच्या तिसर्‍या टप्प्याचे निष्कर्ष इंटरनॅशनल ओपन ऍक्सेस जर्नल एंड्रोलॉजीमध्ये प्रकाशित झाले आहेत.

नवी दिल्ली - पुरुषांसाठी गर्भनिरोधक इंजेक्शन हे आता स्वप्न राहिलेले नाही तर प्रत्यक्षात आले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) या दिशेने घेतलेली पहिली गर्भनिरोधक चाचणी यशस्वी झाली आहे. एकूण ३०३ निरोगी पुरुष स्वयंसेवकांवर हा प्रयोग ७ वर्षे चालला. गैर-हार्मोनल इंजेक्टेबल पुरुष गर्भनिरोधक RISUG (रिव्हर्सिबल इनहिबिशन ऑफ स्पर्म अंडर गाईडन्स) पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे. हे दिर्घकाळ काम करू शकते असं अभ्यासात दिसून आले आहे.

अभ्यासाच्या तिसर्‍या टप्प्याचे निष्कर्ष इंटरनॅशनल ओपन ऍक्सेस जर्नल एंड्रोलॉजीमध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यानुसार, ३०३ निरोगी, लैंगिकदृष्ट्या सक्रिय आणि विवाहित पुरुषांना (वय २५-४० वर्षे) कुटुंब नियोजनासाठी निवडले गेले. त्यांना ६० मिलीग्राम RISUG चे इंजेक्शन देण्यात आले. विशेष म्हणजे कोणत्याही गंभीर दुष्परिणामांशिवाय RISUG सह ९९ टक्के गर्भधारणा टाळता येऊ शकते.

अभ्यासानुसार, RISUG ने ९७.३% एझोस्पर्मिया गाठले. ही एक वैद्यकीय व्याख्या आहे की वीर्यमध्ये कोणतेही व्यवहार्य शुक्राणू नसतात असं सांगते. स्वयंसेवकांच्या पत्नींच्या आरोग्यावरही लक्ष ठेवण्यात आले असून, कोणतेही विपरीत परिणाम होत नसल्याचे आढळून आले. आजपर्यंत महिलांसाठी गर्भनिरोधक गोळ्या सहजपणे उपलब्ध होत होत्या परंतु पुरुषांसाठी कुठलाही पर्याय नव्हता. आता ७ वर्षाच्या अथक प्रयत्नांनी ICMR ला दिशेने मोठे यश हाती लागले आहे.

या चाचणीसाठी जयपूर, नवी दिल्ली, खडगपूर, उधमपूर आणि लुधियाना येथील हॉस्पिटलचा समावेश करण्यात आला होता. या रिसर्चवेळी काही पुरुषांना थोडी समस्या जाणवली, जी लगेच दूरदेखील झाली. पुरुषांना लघवीवेळी जळजळ, ताप अशी समस्या होती. त्याशिवाय कुठलेही दुष्परिणाम पुरुषांवर झाले नाहीत.

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसी