शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

'ही' तुमच्या आवडीची गोष्ट करत राहिल्याने स्मरणशक्ती राहील चांगली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 10:08 IST

एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, मध्यम वयात शरीरिक आणि मानसिक रूपाने सक्रिय राहिल्यावर स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका कमी असतो.

(Image Credit : www.apollopharmacy.in)

अनेकांना सतत गाणी गुणगुणत राहण्याची सवय असते किंवा असे म्हणुया की, आवड असते. ही आवड असणाऱ्यांना त्यांच्या सवयीने चांगलं वाटतं. सतत त्यांचा मूड चांगला राहतो, त्यांना आनंद मिळतो. पण याचे केवळ इतकेच फायदे नाहीत. गाणी गुणगुणत राहणाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, मध्यम वयात शरीरिक आणि मानसिक रूपाने सक्रिय राहिल्यावर स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका कमी असतो. स्वीडनमध्ये ८०० महिलांवर हा रिसर्च करण्यात आला. या महिलांचं वय सरासरी ४७ वर्षे इतकं होतं. 

न्यूरोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चनुसार, मानसिक प्रक्रियांमध्ये वाचणे, गाणी गुणगुणत राहणे, वाद्य वाजवणे, सामूहिक गायन करणे, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जाणे, धार्मिक कार्यक्रमांमध्ये जाणे यांचा समावेश होतो. 

स्वीडनच्या गोदनबर्ग विश्वविद्यालयातील जेन्ना नजर म्हणाल्या की, 'मध्यम वयातील प्रक्रियांमुळे वाढत्या वयात स्मरणशक्ती चांगली राहणे आणि ओळख पटवण्याची क्षमता सुरक्षित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावला जातो. हे फारच आश्चर्यकारक आहे. कारण हे लोक फार सहजपणे आणि फार जास्त पैसे खर्च न करता या गोष्टींचा जीवनात समावेश करू शकतात. 

स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय

वेळोवेळी वेगवेगळ्या रिसर्चमधून स्मरणशक्ती वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी फायदेशीर ठरतात याचे खुलासे झाले आहेत. अनेकदा पौष्टिक पदार्थांचे सेवन न केल्याने आणि  वाढत्या वयामुळेही आपली स्मरणशक्ती कमी होते. अशात कमकुवत झालेली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खालील उपाय करता येतील...

फळ-भाज्यांचे सेवन

फळं आणि हिरव्या भाज्यांमध्ये असणारे अ‍ॅंटीऑक्सिडेंट्स मेंदूच्या रक्त नलिका आणखी मजबूत आणि लवचिक करतात. तसेच फळ-भाज्यांच्या सेवनामुळे डोक्याला फॉलिक अ‍ॅंसिड आणि व्हिटॅमिन मिळतात. जे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी गरजेचे आहेत. यासोबतच वांगी खाण्याचाही मोठा फायदा होऊ शकतो. 

रोज प्राणायाम करा

ध्यान, प्राणायाम आणि व्यायामाने तणाव दूर होतो. आत्मविश्वास वाढतो. एकाग्रता वाढते आणि मेंदूला योग्य प्रमाणात ऑक्सिजन, रक्त आणि पोषक तत्व मिळतात. या सगळ्या गोष्टींमुळे स्मरणशक्ती वाढते.

पुरेशी झोप घ्या

जर तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर पुरेशी झोप घेणे फार महत्वाचे आहे. झोपेमुळे आपण आपल्या डोक्यातील अनेक गोष्टींना आठवू शकतो. चांगल्या झोपेमुळे स्मरणशक्ती कायम ठेवण्याच्या क्षमतेची वाढ होते.

बदाम आणि अक्रोड

स्मरणशक्ती वाढण्यासाठी बदाम खाणं फार उपयोगी मानलं जातं. बदाममधील पोषक तत्व जसेकी प्रोटीन, मॅगनीज, कॉपर आणि रायबोफ्लाविन अल्झायमर हे अनेक रोगांना दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे रोज रात्री 5 बदाम भिजवून ठेवा आणि सकाळी उठून खाल्ल्यास स्मरणशक्ती वाढते.

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्स