(Image Credit : lifealth.com)
सकाळी जॉगिंगपासून ते ऑफिसमधून घरी येईपर्यंत लोक सॉक्सचा वापर करतात. काही लोक असेही असतात जे फार टाइट सॉक्सचा वापर करतात. जर तुम्ही सुद्धा असंच करत असाल तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे. कारण याने तुमच्या आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. टाइट सॉक्स घातल्याने केवळ पायांच्या त्वचेवर निशाणच पडतात असं नाही तर याने ब्लड प्रेशरही फार प्रभावित होतं. चला जाणून घेऊ याने आणखी काय समस्या होतात.
ब्लड सर्कुलेशन
जास्त टाइट सॉक्स घातल्याने पांयामध्ये ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होत नाही. सॉक्समुळे पायांची त्वचेवर दबाव पडतो. ज्यामुळे ब्लड पायांमध्ये खालपर्यंत पोहोचत नाही. याने पाय थंड होतात आणि काही दिवसांनी पायाच्या खालचा भाग सुन्न होऊ शकतो. त्यामुळे टाइट सॉक्स घालणे टाळावे.
हृदयाला ब्लड पंप करण्यात अडचण
टाइट सॉक्स घातल्याने पायांच्या नसांवर दबाव पडतो. त्यामुळे हृदय जेव्हाही ब्लड पंप करेल त्याला जास्त जोर लावावा लागेल. याने हृदयाच्या आरोग्यावर वाइट प्रभाव पडतो. काही दिवसात तुमचे हृदयाचे ठोकेही वेगाने वाढतील. याने येणाऱ्या काळात तुम्हाला हृदयासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
नसांमध्ये गाठी
जास्त टाइट सॉक्स घातल्याने पायांच्या नसांमध्ये गाठी होण्याचाही धोका असतो. टाइट सॉक्समुळे जेव्हा रक्ताचा दबाव नसांवर पडतो तेव्हा रक्त पुढे सरकण्यासाठी जागा तयार करण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे नसांवर दबाव पडतो. या दबावामुळे नसांवर गाठी होऊ लागतात.
पायांना होऊ शकतं इन्फेक्शन
टाइट सॉक्स घातल्याने होणारं आणखी एक नुकसान म्हणजे याने पायांना इन्फेक्शन होऊ शकतं. टाइट सॉक्समुळे घाम जास्त येतो आणि जास्त वेळ पायात सॉक्स घालून राहिले तर इन्फेक्शनचा धोका अधिक राहतो. याने फंगन इन्फेक्शनचा धोका अधिक राहतो. तसेच पायांचा वास येणे आणि खाज अशाही समस्या होतात.
Numbness ची समस्या
Numbness म्हणजे पायांना काहीच न जाणवणे. जर पायात टाइट सॉक्स घातले तर याने नसांवर दबाव पडतो. याने पायांचा खालचा भाग हा सुन्न पडू शकतो. त्यामुळे सैल सॉक्सची निवड करा. तसेच जास्त वेळ सॉक्सही घालून राहू नका.