शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात घरातील माश्या पळवून लावण्यासाठी वापरा 'या' खास ट्रिक्स, दिसणार नाही एकही माशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 10:52 IST

How to get rid of Flies : माश्यांमुळे डिसेंट्री, टायफाईड, कॉलरा आणि गॅस्ट्रोइंट्रीटीस या रोगांचा धोका वाढतो. त्यामुळे या माश्या घरातून पळवून लावण्यासाठी काय करावे तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

How to get rid of Flies : पावसाळा आला की, जसे वेगवेगळे आजार येतात तसे काही कीटकही वाढतात. खासकरून या दिवसांमध्ये डासांसोबत माश्याही घराघरांमध्ये येतात. आरोग्याच्या दृष्टीने हे फार घातक असतं. कारण या दिवसांमध्ये सगळीकडे पाणी चिखल आणि घाण असते ज्यावर माश्या बसलेल्या असतात. त्याच घरात येतात आणि अन्न पदार्थांवर बसतात. तेच आपण खाऊन आजारी पडतो.

माश्यांमुळे डिसेंट्री, टायफाईड, कॉलरा आणि गॅस्ट्रोइंट्रीटीस या रोगांचा धोका वाढतो. त्यामुळे या माश्या घरातून पळवून लावण्यासाठी काय करावे तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही माश्या घराबाहेर काढू शकता.

- कापूर, तुळस, तेल  

संध्याकाळी धूपासोबत कापूर जाळल्यास माश्या कमी होतात. घरात चारही कोपर्‍यात कापराच्या गोळ्या टाका. नुसता कापूर जाळला तरी चालेल. कापराच्या दर्पामुळे माश्या कमी होतात. तसेच तुळशीमध्ये औषधी गुणधर्मासोबत कीटकांना दूर ठेवण्याची क्षमतादेखील आहे. घरात तुळशीचे रोप लावल्यास माश्यांचा वावर कमी होतो. 

त्यासोबतच निलगिरी, लॅव्हेंडर, पेपरमिंट, गवती चहा यासारखी नैसर्गिक तेलांनी कीटकांना दूर ठेवण्यास मदत होते. या तेलामध्ये कापसाचा बोळा बुडवून तो हवाबंद डब्ब्यात ठेवा. ज्याठिकाणी कीटक असतात तेथे हा डबा उघडा करून ठेवा.

- मीठ आणि लिंबू

एक लिंबू आणि 2 चमचे मीठ व एक ग्लास पाणी घ्या. लिंबू कापून एक ग्लास पाण्यात टाका आणि त्यात मीठ टाका. हे चांगलं मिक्स करा आणि एका स्प्रे च्या बॉटलमध्ये टाका. जिथे माश्या दिसतील तिथे स्प्रे करा. 

- तमालपत्र जाळा

वेगवेगळ्या भाज्या, पदार्थांमध्ये तमालपत्र वापरलं जातं. या पानाचा माश्या पळवण्यासाठीही फायदा होतो. तमालपत्र जाळून त्याचा धूर होऊ द्या. या धुरामुळे माश्या पळून जातील. 

- अन्न आणि फळं-भाज्या झाकून ठेवा 

पावसाच्या दिवसांमध्ये अन्न झाकून ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. अन्न उघडं ठेवल्याने घरात माश्या येतात. फळं-भाज्याही झाकून ठेवा.

- किचन स्वच्छ ठेवा

किचन हे माश्यांची आवडती जागा असते. इथेच सगळ्यात जास्त माश्या राहतात. त्यामुळे किचनमध्ये कचरा उघडा ठेवू नका. कचरा नेहमीच झाकून ठेवा. गॅसचा ओटा ब्लिच बेस्ड किंवा क्लोरिन बेस्ड क्लिनर्सने स्वच्छ करा. घरातील लादी डेटॉल किंवा फिनाइलच्या पाण्याने पुसून घ्या.

- खिडक्या-दारं बंद ठेवा

पावसाळ्यात शक्यतो घराच्या खिडक्या आणि दारं बंद ठेवा. बाहेरून आल्यावर पाय निट स्वच्छ धुवा. घर हवेशीर ठेवायचं असेल तर खिडक्यांना जाळी, मच्छरदाणी लावा.

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलHealth Tipsहेल्थ टिप्स