शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

वयानुसार नेमकं किती तास झोपावं?; निद्रानाशाचा आरोग्यावर होतो वाईट परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 16:58 IST

झोपेत व्यत्यय आल्याने अनेक प्रकारच्या समस्यांचा धोका वाढतो. त्यामुळे डॉक्टर पुरेशी झोप घेण्याचा सल्ला देतात. 

निरोगी राहण्यासाठी जशी अन्न आणि पाण्याची गरज असते, तशीच पुरेशी झोपही महत्त्वाची असते. पण, आजच्या धावपळीने लोकांची शांतता हिरावून घेतली आहे. दिवसभराच्या कामाच्या ताणाचा थेट परिणाम त्यांच्या रात्रीच्या झोपेवर होत आहे. झोपेत व्यत्यय आल्याने अनेक प्रकारच्या समस्यांचा धोका वाढतो. त्यामुळे डॉक्टर पुरेशी झोप घेण्याचा सल्ला देतात. 

असे केल्याने केवळ शारीरिकच फायदा होणार नाही, तर मानसिक आरोग्यही सुधारेल. तथापि, एखाद्याला दररोज किती झोपेची आवश्यकता असते हे त्या व्यक्तीच्या वयावर अवलंबून असते. वयानुसार कोणी किती झोपावं? याविषयी जाणून घेऊया...

पुरेशी झोप घेणं महत्त्वाचं का आहे?

तणाव दूर ठेवण्यासाठी अनेकजण रात्रभर टीव्ही किंवा मोबाईलवर चित्रपट पाहतात. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या अहवालानुसार, निरोगी राहण्यासाठी रात्री किमान सात तासांची झोप आवश्यक आहे. उत्तम आरोग्य आणि वाढीसाठी, सर्व वयोगटातील लोकांची झोपण्याची वेळ बदलत राहते. रिपोर्टनुसार, प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी झोपेचे वेगळं गणित असतं. 

४ ते १२ महिन्यांची मुलं - १२ ते १६ तास१ ते २ वर्षे वयोगटातील मुलं - ११ ते १४ तास३ ते ५ वर्षे वयोगटातील मुलं - ११ ते १४ तास६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलं - ९ ते १२ तास१३  ते १८ वर्षे वयोगटातील मुलं - ८ ते १० तास१८ वर्षांनंतर - किमान ७ तास६० वर्षांनंतर - ८ तास

पुरेशी झोप न मिळाल्याने होणाऱ्या समस्या

महत्त्वाच्या कामांप्रमाणेच पुरेशी झोप घेणेही महत्त्वाचे आहे. असे न केल्यास अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. डॉक्टरांच्या मते, पुरेशी झोप न घेतल्याने महिलांमध्ये मधुमेह, हृदयविकार आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढू शकतो. याशिवाय कमी झोपेचा परिणाम शरीरातील पेशींवरही होतो. त्याच वेळी, पुरेशी झोप न मिळाल्याने शरीरातील मिनरल्सचं प्रमाण बिघडू शकतं ज्यामुळे हाडं देखील कमकुवत होऊ शकतात. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स