शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

थायरॉइड आहे; पण कोणता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 07:54 IST

थायरॉइड असं सरसकट म्हणताना त्यातला हा भेदही लक्षात घ्या...  

थायरॉइड हार्मोनचे प्रमाण अधिक झालं तर त्यातून उद्भवणाऱ्या आजाराला म्हणतात हायपरथायरॉइडीझम. थायरॉइड असं सरसकट म्हणताना त्यातला हा भेदही लक्षात घ्या... आपल्या शरीरात थायरॉइड हार्मोनचा समतोल राहणं गरजेचं असतं हे आत्तापर्यंतच्या लेखांमधून स्पष्ट झालंच. थायरॉइड हार्मोनच्या कमतरतेमुळे होणाºया आजाराला हायपोथायरॉइडीझम असे म्हणतात, या उलट थायरॉइड हार्मोनचे प्रमाण अधिक झाले तर त्यातून उद्भवणाºया आजाराला थायरोटॉक्सिकोसिस-हायपरथायरॉइडीझम असे म्हणतात.थायरोटॉक्सिकोसिस व हायपरथायरॉइडीझम या दोहोंमध्ये फरक करणं गरजेचं आहे. या दोन्ही आजारांची लक्षणे साधारणत: सारखी असली तरीही लागणारे उपाय मात्र वेगवेगळे असतात. थायरो-टॉक्सिको-सिसमध्ये रक्तांमधील थायरॉइड हार्मोन प्रचंड प्रमाणात वाढतं. हे अतिरिक्त वाढलेलं प्रमाणच या आजारातील लक्षणांना जबाबदार असतं. थायरोटॉक्सिकोसिस अनेक कारणांमुळे होऊ शकतो. पण ज्यावेळेस थायरॉइड ग्रंथी अधिक सक्रिय होऊन हा आजार होतो त्याला हायपरथायरॉइडीझम असे म्हणतात.लक्षणं काय?आपल्या शरीरामध्ये थायरॉइड हार्मोन्स चयापचय, वाढ व विकास आणि हृदयाचं स्पंदन नियमित ठेवणं ही कार्ये करत असतात. शरीरातील प्रत्येक पेशींवर आपला प्रभाव पाडून तेथील कार्य हे हार्मोन्स नियंत्रणात ठेवतात. पण रक्तात ज्या वेळेस या हार्मोन्सचं प्रमाण अव्वाच्या-सव्वा वाढते तेव्हा अधिक सक्रियतेमुळे या सर्व क्रि या अतिवेगाने घडत असतात. जणू काही शरीरातील क्रि यांवर कोणीतरी फास्ट-फॉर्वर्डचं बटण दाबलं असावं.या अवस्थेत विनाकारण वजन कमी होणं, हाताला कंप सुटणं, जुलाब होणं, ऊन /गर्मी सहन न होणं, दरदरून घाम येणं, छातीत धडधडणं इ. लक्षणं प्रामुख्याने दिसून येतात. ही लक्षणीय लक्षणं बघितल्यावर बरेच वेळा इतर गंभीर आजारांशी याचा संबंध जोडला जातो. त्यामुळे बरेच वेळा निदान करण्यात दिरंगाई होते. म्हणून या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता थायरॉइडची तपासणी करून घेतल्यास आजाराचं निदान होतं.फरक ओळखाथायरोटॉक्सिकोसिस व हायपरथायरॉइडीझम या दोन्हींमध्ये फरक करणं गरजेचं असते. थायरोटॉक्सिकोसिस हा बरेच वेळा थायरॉइडायटीसमुळे होत असतो व थायरॉइडायटीस हा छोट्या मुदतीचा आजार असून, त्याकरता तात्पुरती औषधयोजना करावी लागते. हायपरथायरॉइडीझम हा मुख्यत: ग्रेव्हज या आजारामुळे होत असतो व त्यात थायरॉइड ग्रंथी अधिक सक्रिय असते. ग्रेव्हज या आजारात डोळे, त्वचा व नखांवरदेखील परिणाम होत असतो. डोळ्यांना सूज येणं, लाल होणं व बाहेर येणं यासारखी बाह्य लक्षणं दिसू शकतात.या आजाराचं निदान रक्तातील टी ३, टी ४, टीसीएच या तपासणीने होऊ शकते. पण फक्त रक्त तपासणीने थायरोटॉक्सिकोसिस व हायपरथायरॉइडीझम या दोन्हींमध्ये फरक करणे अवघड जाते. रु ग्णाची बाह्य लक्षणं, थायरॉइड स्कॅन व विशेष रक्त तपासणी यातून तज्ज्ञ डॉक्टरांना योग्य निष्कर्षापर्यंत पोहचण्यास मदत मिळते. योग्य निदान झाल्यावर उपचाराला योग्य दिशा मिळते व हे आजार आटोक्यात येण्यास मदत होते.हायपरथायरॉइडीझम हा दीर्घ मुदतीचा आजार असून, नियमित औषधे घेतल्यास आजार बहुअंशी बरा होतो. रेडिओ आयोडीन थेरपी व सर्जरीसारख्या उपचारांचीदेखील काही वेळेस गरज पडू शकते.‘ना जास्त ना कमी, आरोग्याची देतो हमी’ अशा या छोट्या; परंतु अतिशय महत्त्वाच्या थायरॉइड ग्रंथी व त्याच्या विकारांबद्दल मागील काही लेखांमध्ये आपण जाणून घेतले. आता पुढच्या लेखांमध्ये सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय- वजन ! त्याविषयी बोलू..डॉ. यशपाल गोगटे(लेखक एण्डोक्रिनॉलॉजिस्ट अर्थात हार्मोन तज्ज्ञ आहेत.)dryashpal@findrightdoctor.com

 

टॅग्स :Healthआरोग्य