- डॉ. सुनिता तांदूळवाडकर अध्यक्ष, भारतीय प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ संघटना
त्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजिअन्स) योग्य पद्धतीने वापरली गेली, तर ती मानवासाठी वरदान आहे. आपल्या आरोग्यव्यवस्थेत मूल्यवर्धन करण्याची प्रचंड क्षमता आहे. परंतु, हेही लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, एआय कधीही डॉक्टर-रुग्ण यांच्यातील नात्याची जागा घेऊ शकत नाही. स्त्रीच्या आरोग्यसेवेच्या केंद्रस्थानी नेहमीच डॉक्टर आणि रुग्णामधील संवाद असणार आहे. एआयचा वापर स्वतः निदान करण्यास नव्हे, तर तज्ज्ञांच्या निर्णय प्रक्रियेला साहाय्य करण्यासाठीच व्हायला हवा.
मातृ मृत्यूदर कमी करण्यासाठी...प्रत्येक गर्भधारणेत काही लपलेले धोकेही असतात. एआयमुळे ते लवकर दिसतात आणि त्वरित उपाययोजना करता येतात. हिमोग्लोबिन, रक्तदाबातील बदल, बीएमआय, साखरेची पातळी, थायरॉइड तपासणी, अल्ट्रासाऊंड यांसह आईचा पूर्वेइतिहास आणि आरोग्यसेवेपर्यंतचे अंतर अशा घटकांचा अभ्यास करून एआय उच्च-जोखमीच्या माता ओळखते.
भारत सरकारच्या डिजिटल उपक्रमामुळे आणि आशा / एएनएम नर्सिंग या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याच्या क्षमतेमुळे दूरवरच्या गावांतील मातांना तज्ज्ञ सेवेशी जोडता येते. साधे, रंगकोडित डॅशबोर्ड्स मातांची जोखीम सहज ओळखून देतात. त्यामुळे आशा कार्यकर्ती योग्य वेळी भेट नियोजित करू शकते, रुग्णालयात नेण्यासाठी वाहतूक व्यवस्थाही करू शकते.
एआयमुळे सीटी व अल्ट्रासाऊंडच्या तपासण्या अधिक अचूकपणे समजतात. भ्रूणावरील ताण, वाढ न होणे किंवा इतर विकृती लवकर सापडतात. प्रसूतीदरम्यान किंवा प्रसूतीनंतर होणाऱ्या रक्तस्त्रावाचा अंदाज बांधता येतो आणि त्वरित औषधे, रक्तसाठा आणि तज्ज्ञ सज्ज ठेवता येतात.
दैनंदिन स्त्रीरोगसेवा अधिक सक्षमएआयमुळे तज्ज्ञसेवा जास्त ठिकाणी पोहोचते. गर्भाशयमुखाचा कर्करोग हा भारतीय महिलांमध्ये मृत्यूचे दुसरे मोठे कारण आहे. एआयच्या साहाय्याने एचपीव्ही/सायटोलॉजी तपासणी आणि कोल्पोस्कोपीत मदत मिळते. अल्ट्रासाऊंडमध्ये एआयमुळे अंडाशयातील गाठी, फायब्रॉइड्स, ॲडिनोमायोसिस अधिक अचूकपणे ओळखता येतात. यामुळे शस्त्रक्रियेची गरज आहे की नाही, हे स्पष्ट होते. प्राथमिक आरोग्य सेवेत असामान्य मासिकपाळीच्या रुग्णांना योग्य वेळी उपचार देता येतात.
आयव्हीएफ परिणाम सुधारण्यासाठीआयव्हीएफ उपचार घेणाऱ्या जोडप्यांसाठी प्रत्येक चक्र हा भावनांचा, खर्चाचा आणि धैर्याचा प्रवास असतो. एआय या प्रक्रियेत सातत्यपूर्ण आणि अचूक निर्णय घेण्यास मदत करते. एम्ब्रियो निवडण्यापासून वीर्य विश्लेषण, अंडाशय उत्तेजन, ट्रान्सफरची वेळ निश्चित करणे आदी सर्व प्रक्रियांमध्ये एआयमुळे यशाचे प्रमाण वाढते आणि धोके कमी होतात.
अंतिम निर्णय तज्ज्ञांचा : महिला एआयचा वापर शैक्षणिक साधन म्हणून करू शकतात, परंतु अंतिम निर्णय तज्ज्ञांचा असावा. जेव्हा तंत्रज्ञान शिस्तबद्ध वैद्यकीय सेवा आणि योग्य संवादाला पूरक ठरते, तेव्हा धोके लवकर ओळखले जातात. त्यातून अचूक उपाययोजना केली जाते आणि परिणाम अधिक सुरक्षित ठरतात. त्यामुळे जास्तीतजास्त मातांचे प्राण वाचतील, जास्तीतजास्त निरोगी मुले जन्मास येतील.
Web Summary : AI enhances pregnancy care by detecting risks early, aiding diagnoses, and improving IVF success. It supports experts in making informed decisions, especially in maternal health and gynecological services, ultimately saving lives and ensuring healthier outcomes.
Web Summary : एआई गर्भावस्था देखभाल को जोखिमों का शीघ्र पता लगाकर, निदान में सहायता करके और आईवीएफ सफलता को बढ़ाकर बेहतर बनाता है। यह विशेषज्ञों को सूचित निर्णय लेने में मदद करता है, खासकर मातृ स्वास्थ्य और स्त्री रोग सेवाओं में, अंततः जीवन बचाता है और स्वस्थ परिणाम सुनिश्चित करता है।