आपलं कार्यालयीन मनस्वास्थ्य कसं सांभाळाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 05:30 PM2017-10-10T17:30:06+5:302017-10-10T17:30:12+5:30

आजच्या मानसिक आरोग्य दिनाविषयी एक चर्चा: आपल्या कार्यालयीन मानसिकतेची!

How do you manage your mental health @ office | आपलं कार्यालयीन मनस्वास्थ्य कसं सांभाळाल?

आपलं कार्यालयीन मनस्वास्थ्य कसं सांभाळाल?

Next
ठळक मुद्देबोला, मोकळे व्हा, कार्यालयात कुढू नका.

-मानसी जोशी

आज. 10 ऑक्टोबर. जगभर ‘मानसिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. जगभर वाढणारी कर्मचारी लोकसंख्या अर्थात ऑफिसमध्ये जाऊन काम करणार्‍या माणसांची वाढती संख्या लक्षात घेऊन यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेनं ‘कार्यालयीन मनस्वास्थ अशी या मानसिक आरोग्य दिनाची संकल्पना यंदा मांडली आहे. 
नोकरदार वर्ग हा जागेपणीचा बहुतांश वेळ  आपल्या कार्यालयात/ कामाच्या ठिकाणी घालवत असतो. त्यामुळे ही जागा उत्साहवर्धक, प्रोत्साहन देणारी आणि कामावर जावंसं वाटेल अशी असेल तरच व्यक्तीचं  एकंदर मानसिक स्वास्थ्य आणि पर्यायानं त्याची कामाची क्षमता आणि उत्पादन क्षमता वाढू शकेल.
कार्यालयीन वातावरणच जर रटाळ असेल, कामावर जावंसं वाटत नसेल तर केवळ नाइलाज म्हणून कामावर येणार्‍यांची मनस्थिती काय असेल हे आपणही समजू शकतो.
आपल्याबाबतीत असं होतंय का आपण तपासून पाहिलं पाहिजे.  त्यासाठी काय करता येईल?
आणि म्हणूनच आपल्या कार्यालयीन वर्तनाचा भाग म्हणून, मनस्थितीचा भाग म्हणून आपणही काही गोष्टी करू शकतो.

1) इतरांनी तुमच्याशी ज्याप्रकारे वागावं असं वाटतं तसंच तुम्ही स्वतर्‍शी सुद्धा वागा.
2) कामातून ब्रेक घ्या, स्वतर्‍वर, आयुष्यावर प्रेम करा.
3) इतरांविषयी काहीतरी मनात ठेवण्यापेक्षा, इतरांना गृहित धरण्यापेक्षा, काही गृहीतकं मनाशी बाळगून ठेवण्यापेक्षा मोकळा संवाद साधा. बोला.
4) आपल्या भावना दडपणं, नाकारणं किंवा अयोग्य पद्धतीने मांडणं यापेक्षा त्या सक्षमपणे व्यक्त करा.
5) सहकार्याला महत्व द्या.  स्वतर्‍ची, आपल्या सहकार्‍यांची वरिष्ठांची, हाताखाली काम करणार्‍यांची देखील काळजी घ्या.
6) पूर्वग्रह, गैरसमज आणि गृहीतके सोडून द्या. 
7) आपल्या कामाबाबत वक्तशीर रहा. प्रामाणिक रहा. उत्तम काम करू हा विश्वास मनाशी बाळगा. 
8) सर्वात महत्त्वाचं म्हणजे, काम हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे, हे लक्षात घ्या. पण आयुष्यातल्या अनेक घटकांपैकी तो  एक ‘हिस्सा’ आहे. त्यामुळे आपली कामातील कामगिरी हा देखील आपल्या आयुष्याचा एक हिस्सा आहे, तेच आपलं संपूर्ण आयुष्य नव्हे, हे देखील स्वतर्‍ला सांगा, मान्य करा.

(लेखिका  मानसशास्त्रज्ञ आहेत.)

Web Title: How do you manage your mental health @ office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.