शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही खाता ती फळे पिकवतात कशी? जाणून घ्या यामागचं गौडबंगाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 05:41 IST

आरोग्यासाठी फळे केव्हाही चांगली. डॉक्टरही फळे खाण्याचा सल्ला सतत देत असतात. भाजीपाल्यातूनही आवश्यक प्रथिने मिळत असतात.

आरोग्यासाठी फळे केव्हाही चांगली. डॉक्टरही फळे खाण्याचा सल्ला सतत देत असतात. भाजीपाल्यातूनही आवश्यक प्रथिने मिळत असतात. मात्र, बाजारातून घरी आणली जाणारी फळे असो वा भाजीपाला, ती पिकवली कशी जातात, हे जाणून घेण्याचा हक्क ग्राहकाला आहे, असा महत्त्वाचा निर्णय नुकताच दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. 

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. राजीव शकधर, न्या. तारा वितस्ता गंजू यांच्या खंडपीठाने सांगितले की, कोणती फळे व भाजीपाला कृत्रिमरित्या पिकविली आहेत याची माहिती ग्राहकाला असणे हा त्याचा हक्क आहे. त्यावर अशी माहिती देणारी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जातील असे एफएसएसएआयच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

सेंट्रल इन्सेक्टिसाईड बोर्ड व रजिस्ट्रेशन कमिटीकडून इथिफॉनबद्दल (इथरेल) ना हरकत प्रमाणपत्र न घेतल्यामुळे कस्टम अधिकाऱ्यांनी त्या गोष्टी जप्त केल्या होत्या. त्या विरोधात मेसर्स ट्रेडर्स व मेसर्स एम. व्ही. ट्रेडर्स यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कीटकनाशके ही गैर-कीटकनाशक हेतूंसाठी आयात केली जातात. तेव्हा त्यांच्यासाठी केंद्रीय कृषी व सहकार खात्याच्या अख्यत्यारितील नोंदणी समितीकडून आयात परवाना मिळविणे आवश्यक असते. तसे २०१५ साली परकीय व्यापार खात्याच्या तत्कालीन महासंचालकांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. आयात केलेले इथिफॉन कस्टमच्या अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या ताब्यात दिले नाही.

माहिती घेण्याचा ग्राहकाला अधिकारइथिफॉनचा माणसाशी थेट संपर्क नकोइथीफॉन जोपर्यंत फळ, भाजीपाला यांच्याशी थेट संपर्कात येत नाही तोवर मानवाला त्यापासून काहीही अपाय नाही. इथिफॉनच्या वापरामुळे कर्करोग होण्याची शक्यता नसते असा निष्कर्ष २०२० साली एका तज्ज्ञांच्या समितीने काढला होता. 

फळे, भाजीपाला हा इथेलिन वायू किंवा अन्य घटक वापरून कृत्रिम पद्धतीने पिकविला आहे का, हे ग्राहकांना कळणे आवश्यक आहे. त्यासाठी फळे, भाजीपाल्याच्या पिशव्यांवर तशी माहिती देणे आवश्यक असल्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया (एफएसएसएआय) या संस्थेला दिले आहेत. त्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत, असेही न्यायालयाने एफएसएसएआयला सांगितले.

टॅग्स :fruitsफळे