शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गरम की थंड दूध, शरीरासाठी काय फायदेशीर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 10:30 IST

तुम्हाला दूध पिणे पसंत असो अथवा नसो पण हे सर्वचजण मान्य करतात की, दूध सर्वात हेल्दी आणि पोषक तत्त्वांनी भरपूर असतं.

तुम्हाला दूध पिणे पसंत असो अथवा नसो पण हे सर्वचजण मान्य करतात की, दूध सर्वात हेल्दी आणि पोषक तत्त्वांनी भरपूर असतं. कॅल्शिअम, प्रोटीन, आयोडीन, पोटॅशिअम, फॉस्फॉरस आणि व्हिटॅमिन बी १२ सारखे पोषक तत्त्व भरपूर असलेल्या १ ग्लास दुधाने तुमची दिवसभराची पोषत तत्त्वांची गरज पूर्ण केली जाते.

त्यामुळे फिट आणि हेल्दी राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने रोज कमीत कमी १ ग्लास दूध घेणे आवश्यक मानले जाते. मात्र काही लोकांना थंड दूध पिणे पसंत असतं तर काही लोकांना गरम दूध पिणे पसंत असतं. पण यातील सर्वात चांगला पर्याय कोणता? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. thehealthsite.com या वेबसाइटला प्रसिद्ध डायटीशिअन नेहा चंदना यांनी याबाबत माहिती दिली. 

गरम दुधाचा सर्वात मोठा फायदा हा होतो की, हे सहजपणे पचन होतं. जर तुम्हाला लॅक्टोज पचायला जड जात असतील तर तुम्ही थंड दूध टाळायला हवं कारण ते तुम्हाला पचायला जड जाईल. तुम्ही थंड दुधाचा आनंद त्यात काही धान्याचे पदार्थ मिश्रित करून घेऊ शकता. गरम दुधामध्ये लॅक्टोज कमी होतात आणि यामुळे पोटदुखी, लूज मोशनसारख्या समस्या होत नाहीत. 

गरम दूध प्यायल्याने येते चांगली झोप

जर तुम्हाला झोप न येण्याची समस्या असेल तर तुम्ही झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दुधाचं सेवन करा. दुधात ट्रिप्टोफॅन नावाचं एमिनो अ‍ॅसिड असतं, जे सेराटोनिन आणि मेलाटोनिन नावाचे केमिकल निर्माण करतात. ज्यामुळे तुम्हाला आराम मिळतो आणि चांगली झोप येते. 

अ‍ॅसिडीटी दूर करण्यासाठी थंड दूध

जर तुम्हाला अ‍ॅसिडीटीची समस्या असेल तर थंड दूध फायदेशीर ठरू शकतं. अ‍ॅसिडीटीमुळे पोटात होणारी जळजळ देखील थंड दुधाने दूर होते. यासाठी जेवण केल्यावर अर्धा ग्लास दूध प्यायल्याने अ‍ॅसिडचं शरीरात होणारं उत्पादन नष्ट होतं. आणि अ‍ॅसिडीटीपासून तुम्हाला आराम मिळतो. 

डिहायड्रेशन दूर करण्यासाठी थंड दूध

थंड दूध प्यायल्याने तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता दूर होईल. यासाठी सकाळी थंड दूध पिण्यासाठी सकाळची वेळ सर्वात चांगली मानली जाते. जर तुम्हाला फ्लू आणि कोल्डची समस्या असेल तर मात्र थंड दुधाचं सेवन करू नये.

तर NBT च्या दुसऱ्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, अनेक स्टडीजमधून हे समोर आलं आहे की, थंड दूध प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे अनेक लोक दूध यासाठी पित नाहीत, कारण त्यांना वाटत असतं की, याने त्यांचं वजन वाढेल. मात्र थंड दुधामध्ये असलेल्या कॅल्शिअममुळे मेटाबॉलिज्मचा स्तरही वाढतो. त्यामुळे कॅलरीज वेगाने कमी करण्यास मदत मिळते. 

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सmilkदूध