शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

तरुणांच्या समस्यांवरील होमिओपॅथी उपचार पद्धती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2016 18:05 IST

सध्याच्या धावपळीच्या युगात बदलत्या जीवनशैलीमुळे वृद्धांपासून तरुणांपर्यंत सर्वांनाच आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

-Ravindra More 
सध्याच्या धावपळीच्या युगात बदलत्या जीवनशैलीमुळे वृद्धांपासून तरुणांपर्यंत सर्वांनाच आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. काही शारीरिक त्रास जाणवल्यास लागलीच डॉक्टरांकडे उपचारासाठी धाव घ्यावी लागते. वेगवेगळ्या उपचार पद्धतीचा अवलंब करुन औषधोपचार केल्याने आपल्याला बरेही वाटते. या वेगवेगळ्या उपचार पद्धतीत होमिओपॅथी ही एक प्रभावी उपचार पद्धती असून आजच्या सदरात आपण होमिओपॅथी आणि तरुणाईच्या समस्या याबाबत जाणून घेऊया...
ज्यावेळी सोरा, सिफीलीस व सायकोसिस या तीन मायझम्स (त्रिदोष) च्या संतुलनात बिघाड होतो, त्यावेळी सम: समं शमयंती या सिद्धांतानुसार व्यक्तीच्या लक्षण स्वरुप सारखे होमिओपॅथीक औषध दिले जाते व औषधाने या तिन्ही मायझममध्ये समन्वय साधला जातो. या समन्वयामुळे रोग प्रतिकार क्षमता वाढते व आजार आपोआप समूळ नष्ट होतो.  
होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये औषध निवडताना सर्वप्रथम रुग्णाची वैयक्तिक माहिती घेतली जाते. ज्यामध्ये रुग्णाची शारीरिक व मानसिक लक्षणे, विचार, सवयी, आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना व त्या घटनांचा रुग्णाच्या मनावर कोण-कोणत्या स्वरुपात परिणाम झाला व रुग्ण त्या घटनेचा कसा विचार करतो यासारखी बरीच लक्षणे विचारात घेतली जातात.   
होमिओपॅथी ही खूप लवकर, कमी वेळेते रुग्णाला बरी करणारी उपचार पद्धती आहे. बरे होण्यास लागणारा वेळ हा त्या आजारावर अवलंबून आहे. जसे थंडी, ताप, जुलाब, पोटदुखी अशा अवस्थेत होमिओपॅथीने थोड्याच वेळात आजार संपूर्णपणे घालवता येतो. 
परंतू गंभीर आजार जीर्ण झाल्यावर आजाराची गुंता वाढल्यावर रुग्ण आल्यास ती गुंता सोडवण्यास थोडा वेळ लागतो. होमिओपॅथीने आज टॉन्सिलायटीस, अ‍ॅपेंडीसायटीस, किडनी स्टोन, मुळव्याध, भगंदर, गर्भाशयाच्या गाठी यासारखे अनेक शस्त्रक्रिया करावे लागणारे आजार कोणतीही शस्त्रकिया न करता बरे केले जातात व आजार परत उद्भवू नये यासाठी सुद्धा प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाते.  
या उपचार पद्धतीत अगदी लहान बाळापासून वृद्धांपर्यंत सर्वांना सर्व आजारांवर औषध घेण्यास फार सोपे असून चेतना शक्तीला उत्तेजना दिली जाते. या आधुनिक  होमिओपॅथीचा प्रचार व प्रसार झाल्याने रुग्णांचा कल या उपचार पद्धतीकडे वाढला आहे. त्यामुळे आज सर्दी खोकल्यापासून कॅन्सरसारख्या आजारांवर होमिओपॅथी प्रभावशाली ठरतेय.  
तरुणाई व होमिओपॅथी 
सध्याच्या धावपळीच्या व धकाकीच्या जीवनात पौगंडावस्थेतील चिडचिड, अभ्यासात लक्ष न लागणे, डिप्रेशन, प्रेमभंगातून निर्माण होणारे मानसिक आजार वाढत आहेत. यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धतीने मनाची लक्षणे व शारीरिक लक्षणे याची सांगड घालून आजार पूर्णपणे बरा केला जाऊ शकतो. 
बदलत्या जीवनशैलीनूसार तरुणांनी योग्य व्यायामाबरोबरच संतुलित आहार, खानपानावरदेखील विशेष लक्ष दिले पाहीजे. अन्यथा कमी वयातच लठ्ठपणा, उच्च रक्त दाब यासारखे आजार उद्भवू शकतात.  
किशोरावस्थेत शरीरातील हार्मोन्सच्या बदलावामुळे चेहºयावरील मुरुम (तारुण्यपिटीका) येण्यास सुरूवात होते व त्यामुळे स्वत:बद्दल नकारात्मक भावना निर्माण होते. तर  हार्मोन्सच्या बदलावामुळे मासिक चक्र नियमित न येणे व त्यामुळे येणारा शारीरिक थकवा तसेच पीसीओडी सारख्या आजारांमुळे मुलींना चेहºयावर अनावश्यक केस वाढणे व वजन वाढणे यासारख्या समस्या भेडसावू शकतात. 
अशा प्रकारच्या तरुणाईच्या व्याधींमध्ये होमिओपॅथी उपचाराने आजार कमी वेळात सोप्या पद्धतीने समुळ नष्ट होतात आणि मन व शरीर निरोगी बनते