शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पोट फुगण्याची समस्या दूर कशी कराल? न्यू्ट्रिशनिस्टनी सांगितले सोपे घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 10:57 IST

सिमरन चोप्रा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात त्यांनी पोट फुगण्याची समस्या दूर करण्याचे काही उपाय सांगितले आहेत.

Healthy Foods: अनेकांना पोट फुगण्याची समस्या होते. पोट फुगल्यावर पोटात गॅस बनू लागते. पोटातून गुडगुड असा आवाज येऊ लागतो आणि अनेकदा पोट दुखण्याची समस्याही होते. खाल्लेलं अन्न व्यवस्थि न पचल्यामुळे, घाई-घाईने खाल्ल्यामुळे, बाहेर तेलकट खाल्ल्यामुळे, एकत्र खूप जास्त काही खाल्ल्याने, मसालेदार काही खाल्ल्याने पोट फुगण्याची समस्या होते. त्यामुळे अस्वस्थ जाणवू लागतं. अशात यावर काय उपाय कराल या सल्ला न्यूट्रिशनिस्टनी दिला आहे. या उपायांचा वापर करून तुम्ही समस्या दूर करू शकता.

न्यूट्रिशनिस्ट सिमरन चोप्रा यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात त्यांनी पोट फुगण्याची समस्या दूर करण्याचे काही उपाय सांगितले आहेत. चला जाणून घेऊ काय आहेत हे उपाय...

ब्लोटिंगची समस्या दूर करण्याचे उपाय

लिंबू - लिंबू नॅचरल डाउयुरेटिक्स आणि जेंटल लॅक्सेटिव्ससारखं काम करतं यामुळे लिंबाचा रस पाण्यात टाकून प्यायल्याने फ्लूइड इंटेक वाढतं. याने तुमची पोट फुगण्याची, गॅसची आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. ब्लोटिंग म्हणजे पोट फुगण्याची समस्या अनेकदा बद्धकोष्ठता किंवा गॅसमुळेही होते.

बडीशेप - बडीशेप खाऊन तुम्ही पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करू शकता. यात असे काही तत्व असतात जे इन्फ्लेमेशन, गॅस आणि ब्लोटिंगचं कारण बनवणाऱ्या बॅक्टेरियाना नष्ट करतात. तुम्ही बडीशेप अशीही खाऊ शकता किंवा बडीशेपचं पाणीही पिऊ शकता. 

अननस - अननसामध्ये डायजेस्टिव एंजाइम ब्रोमलेन असतं जे ब्लोटिंगची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. अननसाचा मधला भाग बारीक करून याचा रस सेवन करावा.

पालक - ब्लोटिंगची समस्या ब्लोटिंगची समस्या होत असेल तर पालकाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पालकमध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम भरपूर असतं जे गॅस आणि ब्लोटिंगची समस्या दूर करण्यास मदत करतात.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य