शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फोन नीट धरा, अन्यथा करंगळी होईल वाकडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 07:01 IST

तरुणांमध्ये हातापासून मेंदूशी संबंधित नसांवरही परिणाम 

नवी दिल्ली: तुम्ही मोबाइल करंगळीने म्हणजेच हाताच्या सर्वांत लहान बोटावर धरत असाल तर काळजी घ्या. तुम्ही पिंकी, कार्पल टनल आणि क्युबाइटल टनल सिंड्रोमचे बळी ठरू शकता. यामुळे, बोटांची आणि हातांची रचना विकृत होऊ शकते. याने मेंदूशी संबंधित नसांवरही परिणाम होऊ शकतो. जबलपूरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये अशी प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मोबाईलची सवय अनेकांना लागली असून, याचा नकारात्मक परिणाम प्रत्येकाच्या शरीरावर होताना दिसत असल्याचे आतापर्यंतच्या अनेक अहवालांतून समोर आले आहे. 

केस १: हात सुन्न पडतो कंपनीत काम करणारा तरुण (२५) सर्व कामे फोनद्वारे करतो. करंगळीवर फोन धरण्याची त्याला सवय झाली. त्यामुळे हात सुन्न पडायला सुरुवात झाली. मानेपासून पाठीपर्यंत वेदना सुरू झाल्या. 

केस २: करंगळीवर पडला खड्डा १८ वर्षीय तरुणी करंगळीवर फोन ठेवून फोन वापरतो. यामुळे बोटांचे स्नायू कमकुवत झाले. करंगळीत वेदना होत होत्या. सतत करंगळीवर फोन पकडल्याने करंगळीवर खड्डा पडला. 

काय होते? प्रथम करंगळी वाकडी होण्यास सुरुवात होते. दुसरा टप्पा कार्पल टनल सिंड्रोम असतो. यात तळहात आणि मनगटावर वेदना निर्माण होतात. तिसरा टप्पा क्यूबाइटल सिंड्रोम धोकादायक आहे. यामध्ये बोटांवर ताण आल्याने हाताच्या संरचनेवर परिणाम होऊन स्नायू व मज्जातंतूंवर परिणाम होतो. 

मोबाइलचे वजन किती? सामान्य वजन ११३ ते १९८ ग्रॅम, सरासरी वजन १९९ ते ३०० ग्रॅम, अधिक वजन ३०१ ग्रॅमपेक्षा, कव्हरचे वजन ५० ते २५० ग्रॅम 

मोबाइल करंगळीने जास्त वेळ धरून ठेवल्याने पिंकी, कार्पल टनल आणि क्यूबाइटल टनल सिंड्रोम होतो. वेदना कोपरपासून मानेपर्यंत पसरते. न्यूरोलॉजिकल आजाराचा धोकादेखील असतो. - डॉ. अजय फौजदार, फिजिओथेरपिस्ट

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानHealthआरोग्य