High Cholesterol Sign : हाय कोलेस्टेरॉल हे हृदयरोग आणि हार्ट अटॅकला जबाबदार ठरतं. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे आजकाल शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढत आहे. जर एकदा का शरीरात कोलेस्टेरॉल वाढलं तर आरोग्यासंबंधी अनेक समस्या डोकं वर काढतात. इतकंच नाही तर जीवालाही धोका होतो. कोलेस्टेरॉल वाढल्यावर शरीरात काही लक्षणं दिसतात जी तुम्हाला माहीत असायला हवीत. जेणेकरून वेळीच उपचार घेऊन गंभीर धोका टाळला येईल. अशाच काही लक्षणांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मान-खांदे-पाठीत वेदना
शरीरात जर कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढलं तर तुमची मान आणि खांदे दुखतात किंवा हे अवयव अखडतात. सतत डोकं दुखणे किंवा चक्कर येणे हे सुद्धा कोलेस्टेरॉल वाढल्याचे संकेत आहेत. हाय कोलेस्टेरॉलच्या समस्येमुळे पाठीच्या खालच्या भागात वेदना होतात.
छातीत वेदना
नेहमीच तुमच्या छातीत दुखत असेल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. छातीत वेदनेचं कारण अॅसिडिटी किंवा गॅस समजण्याची चूक तुम्हाला महागात पडू शकते. कारण कोलेस्टेरॉल वाढल्यानं हृदयापर्यंत पुरेसं रक्त पोहोचत नाही. ज्यामुळे हृदयावरील दबाव वाढतो. छातीत वेदना किंवा आखडल्यासारखं वाटत असेल तर हा हाय कोलेस्टेरॉलचा संकेत असू शकतो.
पायांमध्ये वेदना
कोलेस्टेरॉल वाढल्यामुळं पायांमधील ब्लड सर्कुलेशन प्रभावित होतं. पायांमध्ये ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होत नसल्यानं पायांमध्ये वेदना, आखडलेपणा किंवा थकवा जाणवतो. जर तुम्हाला ही लक्षण एकत्र दिसत असतील तर वेळीच चेकअप करावं.