शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Health Tips : उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 16:10 IST

Health Tips : अनेक जण त्वचेची काळजी घेण्यासाठीची पथ्ये कटाक्षाने पाळतात आणि उष्ण हवामानाला अनुसरून आहार घेण्याकडे लक्ष देतात, परंतु उन्हाळ्यामध्ये डोळ्यांचे रक्षण करण्याच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे मात्र दुर्लक्ष करतात.

ठळक मुद्देतापमान अति वाढले तर विविध प्रकारचे आजार होऊ शकतात आणि त्यामुळे डोळ्यांची अधिक काळजी घेणे गरजेचे ठरते, असे ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणतात.

उन्हाळाचा हंगाम सुरू झालेला आहे. आपल्याला सर्वांना एअर-कंडिश्ड खोलीत राहायची, आइस्क्रिम खायची, फळांचा रस प्यायची, पातळ व हलके कपडे घालण्याची आणि बाहेर न जाता घरातच थांबण्याची तीव्र गरज वाटू लागते. पण हा विचार करत असताना आपण डोळे या अतिशय महत्त्वाच्या अवयवाकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. अनेक जण त्वचेची काळजी घेण्यासाठीची पथ्ये कटाक्षाने पाळतात आणि उष्ण हवामानाला अनुसरून आहार घेण्याकडे लक्ष देतात, परंतु उन्हाळ्यामध्ये डोळ्यांचे रक्षण करण्याच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे मात्र दुर्लक्ष करतात.

तापमान अति वाढले तर विविध प्रकारचे आजार होऊ शकतात आणि त्यामुळे डोळ्यांची अधिक काळजी घेणे गरजेचे ठरते, असे ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणतात. कॉन्जंक्टिव्हायटिसमुळे डोळ्यांचा संसर्ग अंदाजे 30% वाढत असल्याचे निरीक्षण आहे. 

पुढील काही समस्याही सर्रास आढळतात:

- सूर्यप्रकाशाशी थेट संपर्क येणे:

 सूर्यप्रकाशामध्ये अतिनिल किरणांचा समावेश असल्याने मोतिबिंदू होण्याचा धोका अधिक असतो, रेटिनाचे नुकसान होण्याची म्हणजे सोलार रेटिनोपॅथीची संभाव्य शक्यताही वाढते. 

- सूर्यप्रकाशातील अतिनिल किरणांशी थेट संपर्क आला तर पेरिजिअम म्हणजे कॉर्नियाची अतिरिक्त वाढ करणारा आजार होऊ शकतो. 

- उन्हाळ्यामध्ये अनेकांना डोळे कोरडे पडण्याचा त्रास होतो. उन्हाळ्याच्या दरम्यान, सूर्यप्रकाशाशी आणि अतिरिक्त उष्णतेशी संपर्क आल्याने डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो व त्यामुळे डोळ्यांतील टिअर फिल्मचे प्रमाण कमी होते. 

- अॅलर्जिक कॉन्जंक्टिव्हायटिस व व्हायरल कॉन्जंक्टिव्हायटिस यामध्ये अचानक वाढ होत असल्याचेही आमच्या मेडिकल सेंटरमध्ये आढळले आहे.उन्हाळ्यामध्ये डोळ्यांना संभावणारे वरील धोके विचारात घेता, उन्हाळ्यामध्ये डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी पुढे दिलेल्या टिप्सचे पालन करावे.

- डोळ्यांना होणारे कोणतेही नुकसान रोखण्यासाठी यूव्ही प्रोटेक्शन सनग्लासेस उपयुक्त ठरतात, तसेच त्यामुळे सूर्यप्रकाशाशी येणारा संपर्कही कमी होतो. 

- उन्हाळ्यामध्ये डोळ्यांमध्ये कोरडेपणा येण्याचे प्रकार सर्रास घडतात. पुरेसे पाणी पिणे, परिपूर्ण आहार घेणे आणि पाणीदार फळे खाणे यामुळे डोळ्यांतील कोरडेपणा रोखण्यासाठी मदत होत असल्याने याद्वारे उन्हाळ्यामध्ये हायड्रेटेड राहावे. 

- डोळ्यांचा नैसर्गिक ओलावा कायम राखण्यासाठी कृत्रिम अश्रू, ल्युब्रिकंट किंवा आय ड्रॉपसारख्या पर्यायी घटकांची मदत होते. उन्हाळ्यामध्ये त्यांचा वापर केला तर डोळ्यांचा कोरडेपणा रोखण्याबरोबरच कोणत्याही प्रकारचा संसर्ग रोखण्यासाठी ओलावा जतन करून ठेवणे शक्य होते. 

- व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असलेल्या पदार्थांचे सेवन करा, जसे हिरव्या पालेभाज्या, गाजर, काकडी, पपई, इ. डोळे या आपल्या अत्यंत महत्त्वाच्या अवयवाची योग्य काळजी घेणयासाठी संतुलित आहार घेणे, पुरेसे पाणी पिणे आणि वर नमूद केलेल्या टिप्स अमलात आणणे गरजेचे आहे.

(लेखक : डॉ. वामशिधर, फॅको रेफ्रॅक्टिव्ह सर्जन मॅक्सिव्हिजन आय हॉस्पिटल )

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सeye care tipsडोळ्यांची काळजी