शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

हार्ट अटॅक येण्याआधी कानात दिसू शकतो हा संकेत, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 14:48 IST

Heart Attack Sign : हार्ट अटॅक दरम्यान रक्ताच्या गाठी तयार झाल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. तसेच रक्ताच्या या गाठी कानांपर्यंत पोहोचू शकतात.

Heart Attack Sign : भारतात डायबिटीससोबतच दिवसेंदिवस वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोका खूप जास्त वाढत आहे. माहितीचा अभाव असल्याने बरेच लोक हृदयरोगांच्या अनेक लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. हृदयरोगांची तर शरीरात अनेक लक्षण दिसतात. मात्र, नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, कानात वेदना आणि जडपणा हे सुद्धा हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. हा धक्कादायक खुलासा नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इंफॉर्मेशन (NCBI) द्वारे प्रकाशित रिसर्चमधून करण्यात आला आहे.

या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, हार्ट अटॅक दरम्यान रक्ताच्या गाठी तयार झाल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. तसेच रक्ताच्या या गाठी कानांपर्यंत पोहोचू शकतात. ज्यामुळे कानात वेदना, जडपणा किंवा कमी ऐकू येणे अशा समस्या होतात.

५०० रूग्णांवर शोध

अभ्यासकांनी ५०० पेक्षा जास्त हृदयरोग असलेल्या रूग्णांवर रिसर्च केला. यात त्यांना आढळलं की, ज्या रूग्णांना हार्ट अटॅक आला होता, त्यांच्यापैकी १२ टक्के रूग्णांनी कानाशी संबंधित समस्या होती. यातील अनेकांना कानात वेदना झाल्या. तर काही लोकांना जडपणा आणि ऐकण्याची समस्या झाली होती. 

एक्सपर्ट्सचा सल्ला

हृदयरोगासंबंधी या रिसर्चचे मुख्य डॉ. डेविड मिलर यांच्यानुसार, कानात जडपणा किंवा वेदना हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. कोणत्याही कारणाशिवाय कानात वेदना होत असेल किंवा जडपणा वाटत असेल तर हे हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. अशात वेळीच डॉक्टरांना संपर्क करावा. ते असंही म्हणाले की, कानात वेदना किंवा जडपणा हार्ट अटॅकचा एकमेव संकेत नाही. हे कानात इन्फेक्शन, सायनस किंवा मायग्रेनसारख्या इतर समस्यांचं देखील लक्षण असू शकतं. त्यामुळे योग्य कारण जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

या रिसर्चमधून अशीही बाब समोर आली की, अनेकदा हार्ट अटॅकची कॉमन लक्षणं जसे की, छातीत वेदना किंवा श्वास घेण्यास समस्या हे दिसत नाहीत. अशात कानात वेदना आणि जडपणा यांसारख्या लक्षणाकडे लक्ष देण्याची गरज पडते. खासकरून वयोवृद्ध आणि डायबिटीसच्या रूग्णांमध्ये हार्ट अटॅकचा हा संकेत दिसू शकतो. 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHeart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्स