शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यात जास्त वाढतो हार्ट अटॅकचा धोका, अशी घ्या हृदयाची काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 15:49 IST

Heart Attack : उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात हृदयासंबंधी समस्यांचा अधिक सामना करावा लागतो. हिवाळ्यात जसजसं तापमान कमी होतं, शरीराचं तापमान कंट्रोल करण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते.

Heart Attack : हृदय आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव असतो. हृदय आपल्याला जीवंत ठेवण्यासाठी नॉनस्टॉप काम करतं. त्यामुळे त्याची काळजी घेणं आपल्यासाठी महत्वाचं असतं. पण चुकीच्या लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्यामुळे हृदयाला नुकसान पोहोचतं. हिवाळ्यात हार्टच्या समस्या (Heart Disease) अधिक वाढतात. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात हृदयासंबंधी समस्यांचा अधिक सामना करावा लागतो. हिवाळ्यात जसजसं तापमान कमी होतं, शरीराचं तापमान कंट्रोल करण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते.

हिवाळ्यात बॉडी टेम्प्रेचर कमी झाल्याने आपला सिम्पेथेटिक नर्वस सिस्टम अॅक्टिव होतो आणि कॅटेकोलामाइनचा स्त्राव वाढू शकतो. याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे हार्ट रेट, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आणि रक्ताच्या गाठी तयार होण्याची प्रक्रिया वाढू शकते. या सर्व गोष्टींमुळे हार्ट अटॅकचा (Heart Attack) धोका वाढतो. फोर्टिस हॉस्पिटल कल्याणचे डॉ. जकिया  खान यांनी हिवाळ्यात हृदय फिट ठेवण्यासाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत. 

स्ट्रेस घेऊ नका - हार्ट अटॅक आणि हृदयासंबंधी आजारांचं मुख्य कारण स्ट्रेस असतो. एक्यूट स्ट्रेसमुळे थेट हार्ट अटॅक येऊ शकतो आणि  क्रोनिक स्ट्रेसने हृदयाच्या धमण्यांच्या आतील थरात बदल होऊ शकतो. ज्याने सूज येऊ शकते, ज्यामुळे रक्ताच्या गाठी तयार होऊ शकतात आणि सोबतच हार्ट अटॅकही येऊ शकतो.

आवडीचं काम करा - गार्डनिंग, पेंटिंग, रीडिंग आणि म्युझिक ऐकल्याने तणाव कमी केला जाऊ शकतो. तुम्ही योगा आणि मेडिटेशनही करू शकता. याने तुम्हाला स्ट्रेस कमी करण्यास बराच फायदा होऊ शकतो.

भरपूर झोप घ्या - हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही पुरेशी झोप घेणं फार गरजेचं असं. सोबतच काम करताना मधे मधे ब्रेक घेत रहा. भरपूर झोप याचा अर्थ ८ तासांपेक्षा जास्त झोप नाही. दिवसातून ७ ते ८ तास झोप शरीरासाठी गरजेची असते. पण त्यापेक्षा जास्त वेळ झोपाल तर त्याचे उलट परिणाम होऊ शकतात.

रोज एक्सरसाइज करा - दिवसातून कमीत कमी ३० मिनिटे एक्सरसाइज करा. हिवाळ्यात घराबाहेर एक्सरसाइज करणं टाळा. कारण बाहेर थंडी जास्त असते.  अशात तुम्ही योग्यप्रकारे एक्सरसाइज करू शकणार नाही. तुम्ही सायकलिंग, ट्रेडमिल, योगासारखे इनडोर एक्सरसाइज करू शकता.

जास्त मीठ आणि साखरेपासून  दूर रहा - आहारात सूर्यफूलाचं तेल किंवा सरसुच्या तेलाचा वापर करा. हे पॉलअनसॅचुरेटेड असतात. आपल्या रोजच्या आहारात सलाद आणि फळांचा समावेश करा. जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थ खावीत. फास्ट फूडपासून दूर रहा.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHealth Tipsहेल्थ टिप्स