शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीवर मांडी घालून बसण्याचे हे आहेत आश्चर्यकारक फायदे; तुम्हाला माहितही नसतील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 16:10 IST

जमिनीवर मांडी घालून बसण्याचे असंख्य फायदे आहेत. ही पद्धत आपल्याकडे फार पूर्वीपासून चालत आलेली आहे.

Health Tips : जमिनीवर मांडी घालून बसण्याचे असंख्य फायदे आहेत. ही पद्धत आपल्याकडे फार पूर्वापारपासून चालत आलेली आहे. त्यासाठी जमिनीवर बसताना कसं बसावं, मांडी घालून बसण्याची नेमकी योग्य पद्धत कोणती? याबाबत आपण जाणून घेणार आहोत. 

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खाली जमिनीवर मांडी घालून बसण्याला फार महत्व आहे. त्यामागे काही ठोस कारणेही आहेत. जमिनीवर बसणं, खाली बसून जेवण करणं, हाताने जेवण खाणं, तसेच जेवणासाठी मातीच्या भांड्यांचा वापर करणं तसेच लवकर निजे लवकर उठें या म्हणीचं त्याकाळी अगदी कटाक्षाने पालन केलं जायचं. पण तुम्हाला माहितीये का? या सगळ्या गोष्टींमागे आरोग्याचा मंत्र लपलाय. परंतु काळानुसार या मांडी घालून बसण्याची पद्धत मागे पडली आहे. पण जमिनीवर मांडी घालून बसल्याने शरीराला वेगवेगळे फायदे मिळतात. पूर्वीपासून चालत आलेल्या या पद्धतीमध्ये अनेक आरोग्यदायी फायदे दडलेले आहेत. जमिनीवर बसण्याचे नक्की काय फायदे आहेत हे आपण समजून घेऊयात... 

'हे' आहेत फायदे- 

१) बॉडी पॉश्चर सुधारतो-

जमिनीवर मांडी घालून बसल्याने शरीराची मुद्रा सुधारते तसेच पचनक्रियादेखील तंदुरुस्त राहते. शरीरामध्ये लवचिकता येते आणि शरीर मजबुत बनतं. शिवाय पाठीचा कणा सरळ राहतो. 

पण जमिनीवर बसल्यावर त्याचे तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुमची बसण्याची पद्धत योग्य असेल. चुकीच्या पद्धतीने बसल्यास त्याचे आरोग्यवर दुष्परिणाम होतात, असं तज्ज्ञ सांगतात. 

२) पचनक्रिया सुधारते-

पोटाची पचनक्रिया सुधारण्यासाठी जमिनीवर मांडी घालून बसणं  उत्तम आहे. त्याशिवाय मांडी घालून बसल्यावर ठरविक वेळेनंतर बसण्याच्या स्थितीत बदल करावा. तसं न केल्यास त्यामुळे बॅकपेनचा त्रासही होऊ शकतो. जर जमिनीवर बसल्यानंतर त्याचा तुम्हाला त्रास होत असेल तर समजुन जा की, तुमची बसण्याची पद्धत चुकीची आहे. 

३) सांधेदुखीपासून आराम-

जर तुम्ही पाठदुखी किंवा कंबरदुखी यांसारख्या समस्येने त्रस्त असाल तर मुद्दामहून जमिनीवर बसण्याचा प्रयत्न करावा. असं केल्याने गुडघेदुखी तसेच पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास कमी होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मांडी घालून जमीनीवर बसल्याने स्नायुंची चांगली कसरत होते. तसेच जमिनीवर बसल्याने पाठदुखीची तक्रार करणं विसराल. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सLifestyleलाइफस्टाइल