शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
5
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
6
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
7
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
8
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
9
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
10
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
11
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
12
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
13
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
14
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
15
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
16
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
17
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
18
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
19
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
20
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

Health: ‘हा’ आजार प्रचंड वेगाने पसरतोय..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 13:18 IST

Health: खंरच कोरोना काळात काही मुलांना बाहेर सर्व बंद असल्यामुळे गोवरची लस मिळाली नाही का? ज्या मुलांत गोवर आढळला, त्यांचा वयोगट बघितला पाहिजे.

- डॉ राजू खुबचंदानी (वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ)खंरच कोरोना काळात काही मुलांना बाहेर सर्व बंद असल्यामुळे गोवरची लस मिळाली नाही का? ज्या मुलांत गोवर आढळला, त्यांचा वयोगट बघितला पाहिजे. जर तीन वर्षांवरील मुलांना झाला असेल, तर त्यांनी यापूर्वी लस घेतली होती का? पाच वर्षांपेक्षाही मोठ्या मुलांमध्ये लस घेऊनसुद्धा हा संसर्ग आढळून येतो का? या विविध प्रश्नांवर संशोधनाची गरज आहे. गेली ४१ वर्षे मी बालरोगतज्ज्ञ म्हणून काम करीत आहे. गोवराची अशी साथ येणे गंभीर आहे. गेल्या १०-१२ वर्षांत मी गोवराचे एक-दोन रुग्ण पाहिले असतील. काही तरुण डॉक्टरांना तर रुग्णही पाहायला मिळाले नसतील. इतके गोवराचे प्रमाण मुंबईत कमी झाले होते. कारण आजाराला प्रतिबंध करणारी लस इतकी प्रभावी होती, की ती घेतली तर हा आजार होत नव्हता. म्हणून तरुण डॉक्टरांनी आता हे लक्षात ठेवले पाहिजे, की सध्या लाल पुरळ आणि ताप आला असेल, तर हा रुग्ण गोवराचा असू शकतो, हे गृहीत धरून तपासण्या आणि चाचण्या करून योग्य निदान करावे.  मला आठवतंय मी १९९० ते २००२ अशी बारा वर्षे कस्तुरबा आणि नायर रुग्णालयात मानद बालरोगतज्ज्ञ म्हणून सेवा देत होतो. त्यावेळी वर्षभरात एक असा सीझन यायचा त्यावेळी गोवराच्या आजाराने वॉर्ड पूर्ण भरलेला असायचा. रोज या आजाराने एक ते दोन मृत्यू व्हायचे. हा आजार गंभीर आहे. वेगाने पसरतो. त्याच्यावर योग्य वेळी योग्य उपचार गरजेचे असतात. योग्य उपचार न मिळाल्यास काहींना इतका त्रास होतो की त्यांच्या श्वसनव्यवस्थेवर परिणाम होतो. व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. 

पूर्वी लोकांत गैरसमज होता. गोवर आणि कांजण्याचा आजार झाला की त्याला देवी आली, असे म्हणायचे. मग त्याला कडुलिंबाची पाने पाण्यात घालून अंघोळ घातली जायची मात्र आता चित्र बदलले आहे. लसीचे महत्त्व पटलेले आहे. त्यामुळेच मागच्या काही वर्षांत गोवराचे रुग्ण पाहायला मिळत नव्हते. सध्याच्या या घडीला मी स्वतः काही दिवसांपूर्वी चार रुग्ण बघितले. त्या रुग्णाच्या पालकांना विचारले असता त्यांनी सांगितले अशा स्वरूपाचे रुग्ण आमच्याकडे आहेत. याचा अर्थ या आजाराची साथ वाढत आहे. याला वेळीच लसीकरणाच्या मार्गाने आळा घातला पाहिजे.

टॅग्स :Healthआरोग्य