शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

HEALTH : ‘मिसकॅरेज’ टाळण्यासाठी हे आहेत प्रभावी उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 13:02 IST

कधीकधी ही गोड बातमी अचानक झालेल्या मिसकॅरेजमुळे आपल्या आयुष्यात दु:खाची घटना बनते

-Ravindra Moreकोणत्याही महिलेसाठी गर्भारपण हा एक सुखद अनुभव असतो. मात्र तेवढाच आवानात्मकदेखील असतो. कारण कधीकधी ही गोड बातमी अचानक झालेल्या मिसकॅरेजमुळे आपल्या आयुष्यात दु:खाची घटना बनते. अशावेळी बऱ्याच महिला मानसिकरित्या एवढ्या खचतात की, त्याचा परिणाम पुढील गर्भारपणावर होतो. खरेतर मिसकॅरेज हा एक अपघात असतो त्यामुळे तुमच्या पुढील जीवनावर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे आपण बाळासाठी प्रयत्न करणे अजिबात सोडू नये. आज आम्ही आपणास काही घरगुती उपाय सांगणार आहोत, जेणेकरुन आपणास मिसकॅरेजसारखी समस्या उद्भवणार नाही. * सात्विक आहारास प्राधान्य द्यावेयशस्वी गर्भधारणेसाठी स्त्रीसाठी सतुंलित आहारासोबत सात्विक आहारदेखील तेवढाच महत्त्वाचा आहे. सात्विक आहार म्हणजे तो आहार जो राजसी आहाराप्रमाणे अती तेलकट, तिखट व तामसी आहारासारखा जड नसतो. शिवाय त्यात फक्त शाकाहारालाच महत्त्व न देता जो आहार घेतल्याने आपणास निरोगी,आनंददायी वाटते व पोटाला आराम मिळेल असा आहार होय. स्त्रीने अन्न वेळेवर खाणे हे देखील खूप महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या सल्लानूसार गर्भवती स्त्रीने दोन जीवांसाठी म्हणून भरपूर खाऊ नये. तर त्याऐवजी थोडे थोडे अन्न वेळेवर खावे . * धावपळ टाळावीगर्भधारणेदरम्यानची धावपळ मिसकॅरेजला कारणीभूत ठरु शकते. गर्भधारणेदरम्यान शरीरात हॉमोन्सचे संतुलन असणे खूप आवश्यक असते. यासाठी यादरम्यान धावपळ टाळावी. बऱ्याच महिला यादरम्यानही नाईट शिफ्ट अथवा रात्री उशीरापर्यंत काम करतात. त्यामुळे स्त्रीच्या शरीरामध्ये अयोग्य बदल होतात. शिवाय तीला अशावेळक्ष जोडीदाराची साथ नसेल तर घर व नोकरी सांभाळण्यामुळे तिचा ताणही अधिक वाढतो. गर्भधारणे दरम्यान स्त्रीची मानसिक स्थिती चांगली असण्यासाठी स्त्रीच्या शरीरातील पित्तप्रकृती देखील उत्तम असणे गरजेचे आहे. यासाठी बाळासाठी प्रयत्न करीत असाल तर वेळेवर झोपा व श्वासाचे व्यायाम, मेडीटेशन करा ज्यामुळे तुम्ही आनंदी रहाल.     * स्वत:कडे अजिबात दुर्लक्ष नकोगर्भधारणेसाठी प्रयत्न करताना स्त्रीने स्वत:कडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये. विशेष म्हणजे आपण रात्री वेळेवर झोपता का आणि आपणास सकाळी उठल्यावर फ्रेश वाटते का? याकडे व्यवस्थित लक्ष द्या. तसेच दररोजच्या कामाचे नियोजनही खूप आवश्यक आहे. पोटाच्या काही तक्रारी तर नाहीत ना,  याकडेही वेळेवर लक्ष द्यावे. * नियमित व्यायाम करागर्भारपणात काही हलके व्यायाम करण्यास डॉक्टरदेखील सल्ले देतात. यासाठी ४५ मिनीटे चालणे, ५ ते १० मिनीटे योगासने करणे असे व्यायाम आपण नक्कीच करु शकता. यामुळे तुमच्या शरीरात लवकरच सकारात्मक परिणाम दिसू लागतील. तसेच पवनमुक्तासन, वज्रासन व पर्वतासन अशा योगासनांमुळे स्त्रीचे शरीर सुखरुप गर्भधारणा व सुलभ प्रसुती साठी तयार होते. योगाभ्यासामुळे तुमचे शरीर निरोगी व मन निवांत होते. त्यामुळे तुमच्या मनातील बाळाच्या जन्माविषयी असलेली चिंता व काळजी आपोआप दूर होते.  * गर्भधारणे अगोदर शरीर ‘डिटॉक्सिफीकेशन’ कराप्रत्येक जो़डप्याने बाळासाठी प्रयत्न करण्यापुर्वी प्रथम एखाद्या उत्तम आयुर्वेदिक तज्ञाचा सल्ला घेऊन ‘संशोधन’ अथवा ‘डिटॉक्सीफिकेशन’ द्वारे आपली शरीरप्रकृती व त्यामधील त्रिदोष समजून घ्यायला हवेत. गर्भधारणेसाठी प्रयत्न करताना त्यांनी पंचकर्म उपचार घेऊन शरीरात निर्माण झालेले टॉक्सिन्स बाहेर टाकणे खूप गरजेचे असते. या उपचारांमुळे गर्भधारणा व गर्भारपण दोन्हीही सुखरुप होते.