शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
4
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
5
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
6
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
7
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
8
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
9
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
10
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
11
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
12
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
13
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
14
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
15
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
16
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
17
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
18
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
19
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?

HEALTH : ​दुसऱ्या बाळाच्या तयारीआधी ‘या’ ६ गोष्टी महत्त्वाच्या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 15:01 IST

तुम्ही दुसऱ्या बाळासाठीही रोमॅन्टीक हनिमुन प्लॅन करु शकता. कारण अशा गोष्टींसाठी पुरेसा एकांत गरजेचा असतो.

-Ravindra Moreपहिलं बाळ एकाकी पडू नये म्हणून बहुतेक कपल्स दुसऱ्या बाळाचे प्लॅनिंग करतात. शिवाय दोन मुलांचा साभाळ करणे ही देखील तारेवरची कसरतच असते. कारण पूर्ण वेळ बाळांना सांभाळण्यातच जातो. कधीकधी सतत मुलांचे डायपर बदलत राहिल्याने तुम्हाला तुमच्या आवडत्या गोष्टी करण्यास वेळ कमी मिळू शकतो. पण आपण जर काही गोष्टींचे व्यवस्थित नियोजन केले तर हा तुमच्या आयुष्यातला सुखद असा काळ ठरु शकतो.१. पहिल्या बाळाला स्वावलंबी बनवादुसऱ्या बाळाचा विचार करण्याआधी पहिले बाळ तुमच्यावर अवलंबून राहणार नाही याची काळजी घ्या. यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या अपत्यामध्ये कमीतकमी तीन ते चार वर्षाचे अंतर ठेवा. शिवाय त्याला स्वावलंबी होण्यासाठी स्वत:च्या हाताने जेवणे, टॉयलेटला जाणे, स्वत:चा ड्रेस घालणे, खेळणी जागेवर ठेवणे या सवयी त्याच्या वयाच्या दुसऱ्या वषार्पासूनच लावा. त्यामुळे जेव्हा तुम्ही दुसऱ्यादा आई व्हाल तेव्हा तुम्हाला नवीन बाळाकडे व्यवस्थित लक्ष देता येईल.२. रोमॅन्टीक हनीमुन प्लॅन करातुम्ही दुसऱ्या बाळासाठीही रोमॅन्टीक हनिमुन प्लॅन करु शकता. कारण अशा गोष्टींसाठी पुरेसा एकांत गरजेचा असतो. हनीमुनला जाताना तुमच्या पहिल्या बाळाला आई, बहीण अथवा सासरच्या मंडळींकडे ठेवा. असे करताना अपराधी वाटून घेऊ नका कारण तुम्ही तुमच्या बाळाला भावंडं मिळावं यासाठीच हे प्रयत्न करत आहात.३. बचत करणे सुरु करादोन मुलांच्या संगोपनासाठी आपणाजवळ पुरेसा पैसा असणे गरजेचे आहे. यासाठी आपणास अधिक बचत करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा. विशेष म्हणजे हे पहिल्या बाळाच्या जन्मानंतरच करायला हवे होते. पण काही हरकत नाही आता जर तुम्ही दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्ही हे आवर्जुन करणे गरजेचे आहे.४. काही वेळ एकांतात घालवादुसऱ्या प्रेगन्सीनंतर तुम्हाला स्वत:साठी वेळ देणे अजिबात शक्य होणार नाही.यासाठी आता एक दिवस फक्त स्वत:साठी घालवा.कोणालाही बरोबर न घेता तुमच्या आवडत्या ठिकाणी जा व फक्त तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा.  ५. गृह सजावट करातुमचे दुसरे बाळ येण्यापुर्वी तुमचे घर छान सजवा.तुमच्या दोन्ही मुलासांठी नवीन बेड व वॉर्डरोब खरेदी करा. कारण एकदा तुमची दुसरी डिलिव्हरी झाली की तुम्हाला दोन मुले सांभाळताना या गोष्टी करण्यासाठी वेळच मिळणार नाही.६. आरोग्य सुदृढ ठेवातुम्ही दुसऱ्यादा प्रेगन्ट असाल तर आता तुम्हाला स्वत:च्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी संतुलीत व पौष्टिक आहार, चालणे, धावणे व योगासने या गोष्टी तुम्ही नक्कीच करु शकता.Also Read : ​HEALTH : ‘मिसकॅरेज’ टाळण्यासाठी हे आहेत प्रभावी उपाय !