शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

HEALTH: रोज एक कप कॉफी घ्या अन् आयुष्यमान वाढवा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2017 18:10 IST

नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार रोज एक कप कॉफी घेतल्याने आयुष्यमान वाढते असे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी कॉफी, हृदय व रक्तवाहिन्यांसंदर्भातील आजार आणि वाढते वय यासंबंधी हे संशोधन जाहीर केले आहे. ​

आज प्रत्येक भारतीयाला चहा, कॉफी पिण्याची सवय आहे. जास्त प्रमाणात चहा, कॉफी घेतल्यास आरोग्यासाठी घातक आहे असे बऱ्याचदा सांगितले जाते. मात्र, नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार रोज एक कप कॉफी घेतल्याने आयुष्यमान वाढते असे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी कॉफी, हृदय व रक्तवाहिन्यांसंदर्भातील आजार आणि वाढते वय यासंबंधी हे संशोधन जाहीर केले आहे.वयोवृद्ध लोकांमध्ये हृदयाला पुरवठा करणाऱ्या काही धमन्यांची पोकळी कमी होऊन नुकसानकारक प्रक्रिया घडते. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमधील पोकळी कमी होत गेल्यामुळे कर्करोग, अल्झायमर आणि इतरही आजारांना निमंत्रण मिळत असल्याने मृत्यूचा धोका मोठा प्रमाणात वाढतो, असे संशोधकांनी स्पष्ट केले. मात्र, कॉफी घेतल्याने त्यातील कॅफेनयुक्त पदाथार्मुळे ही प्रक्रिया रोखण्याबरोबरच हृदय व रक्तवाहिन्यांवरील अतिरिक्त दाब टाळता येणे शक्य आहे. त्यामुळेच कॉफी घेणे फायदेशीर ठरते. या अभ्यासात रक्ताचे नमुने, सर्वेक्षणातील माहिती, वैद्यकीय आणि कौटुंबिक माहिती या माध्यमातून सहभागी झालेल्या शेकडो जणांची तपासणी करण्यात आली. यातील अनेकांना हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आजार होते. चयापचय, शरीरात बिघाड करणारे पदार्थ, न्यूक्लिअस अ‍ॅसिड यांमुळे रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार आणि हृदयविकाराला चालना मिळते. मात्र, या सगळ्यावर कॉफी हा सर्वाधिक प्रभावी उपाय आहे. त्याचप्रमाणे कॉफीमुळे आयुष्यमानात कशी वाढ होऊ शकते हेदेखील संशोधकांनी स्पष्ट केले.