शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जुळ्या बालकांवरील उपचारासाठी करावा लागला ८० किमीचा प्रवास; एका मुलाची प्रकृती अत्यवस्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:27 IST

पालघर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सलाइनवर, उपचारासाठीच्या सुविधा उपलब्ध नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क

सफाळे : पालघर जिल्ह्यात शासकीय आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. माता आणि बालमृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्हा मुख्यालयालगतच्या ग्रामीण भागात सिझेरियन प्रसूतीसारख्या सुविधा नसल्याने गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी गिराळे गावातून पालघरचे ग्रामीण रुग्णालय गाठावे लागले. परंतु, प्रसूतीनंतर जन्मलेल्या जुळ्यांना उपचारासाठी पालघरवरून  जव्हारपर्यंतचा ८० कि.मी.चा प्रवास करावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उपचार मिळण्यासाठी उशीर झाल्याने जव्हार रुग्णालयात दाखल जुळ्यांपैकी एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे.

तपासणीदरम्यान प्रकृती स्थिर नव्हती

गिराळे ग्रामपंचायत हद्दीतील नगावे गावातील गर्भवती महिला निकिता नीलेश डगला हिला शुक्रवारी प्रसूतीसाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूतीदरम्यान तिने जुळ्यांना जन्म दिला; परंतु तपासणीदरम्यान जुळ्यांची प्रकृती स्थिर नसल्याने, तसेच नवजात बालकांवर उपचाराची सुविधा उपलब्ध नसल्याने जुळ्यांना पुढील उपचारासाठी जव्हार उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला पालघर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डगला कुटुंबाला दिला होता.

उपचारास उशीर

अद्ययावत वैद्यकीय सुविधा असलेली रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात धावाधाव केल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध झाली. सुमारे ८० किमी अंतर आणि अडीच ते तीन तासांचा प्रवास करून जुळ्यांना जव्हारच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रसूतीनंतर उपचार मिळण्यासाठी उशीर झाल्याने दोघा जुळ्यांपैकी एकाची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती डगला कुटुंबीयांनी दिली.

टॅग्स :palgharपालघर