शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

HEALTH : ​चाहूल उन्हाळ्याची...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2017 17:54 IST

कामानिमित्त बाहेर पडावे लागत असल्याने उन्हाचा तडाखा सहन करण्यापलीकडे असतो. पण काही छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास उन्हाचे तापणे काही प्रमाणात का होईला सुसह्य होईल.

-Ravindra Moreउन्हाळ्याची चाहूल लागली असून तापमानाचा पारा वर चढायला लागला आहे. दुपारी तर बाहेर पडताना तापलेल्या सूर्याचे दर्शन बऱ्याचजणांना असह्य वाटू लागले आहे. मात्र कामानिमित्त बाहेर पडावे लागत असल्याने या वेदना सहन केल्याशिवाय पर्याचच नसतो. पण काही छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास उन्हाचे तापणे काही प्रमाणात का होईला सुसह्य होईल. उन्हात वापरण्याचे गॉगल्सदुपारच्या बाहेर पडताना किंवा उन्हात ड्राइव्ह करतेवेळी असा गॉगल आपल्याकडे हवाच. कारण गाडी चालविताना समोरून तुमच्या चेहऱ्यावर पडत असलेल्या प्रखर ऊन्हाचा तडाखा जाणवणार नाही. कडक उन्हात दिसणारे मृगजळही हा गॉगल डोळ्यांवर असला तर दिसत नाही.हातमोजे (हॅण्डग्लोज)उन्हाशी संपर्क आल्याने शरीराचा काही भाग काळवंडतो. बऱ्याचदा उन्हाच्या प्रखरतेने त्वचा जळते आणि तिचा वरचा थर सालींप्रमाणे निघतो. ही समस्या उद्भवू नये म्हणून हातमोजे वापरा. कारण यामुळे  गाडी चालवताना हाताचे पंजे आणि बोटंही व्यवस्थित झाकली जातील. बाजारात बरीच स्टायलिश हँडग्लव्हज दाखल झाले आहेत. त्यांचा वापर करणंही फायद्याचं ठरेल. नारळपाणी, ग्लुकोज, रसाळ फळेशक्यतो दुपारच्या वेळेस बाहेर पडण्याअगोदर नारळपाणी घेतलं तर उत्तमच. तसेच दुर्गम स्थळी जाणार  असाल, तर श्रीजल पावडरचं पॅकेट, ग्लुकोज किंवा ग्लुकोजयुक्त बिस्किटं जवळ बाळगा. भरपूर पाणी पिण्यासह या गोष्टींनी मळमळणं, डोकं दुखणं या गोष्टी टाळता येतील. उन्हाळ्यात शरीराचे तापमान थंड ठेवण्यासाठी रसाळ फळे आणि विविध प्रकारचे ज्यूस खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.स्कार्फबऱ्याचदा स्कार्फला हटके स्टाइलसाठी वापरले जाते. मात्र उन्हाच्या तडाख्यासाठी वाचण्यासाठी याचा खरा उपयोग होऊ शकतो. चेहऱ्याभोवती स्कार्फ व्यवस्थित गुंडाळून मान आणि गळाही झाकता येतो. अनेकजण कॅप आणि स्कार्फ यांचं छान कॉम्बिनेशन करतात, त्यामुळे या दिवसात स्कार्फ जवळ ठेवाच.