शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

​Health : ...तर अशा प्रकारे करिना कपूरने प्रेग्नन्सीनंतर वजन केले कमी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2017 15:16 IST

प्रेग्नन्सीनंतर वाढलेले वजन तिने काही महिन्यातच कमी केले, जाणून घ्या...

-Ravindra Moreकरिना कपूर खानने तीन महिन्यापूर्वीच तैमूरला जन्म दिला. मात्र तीनच महिन्यात करिना अगोदरसारखी स्लिम दिसायला लागली. एवढेच नव्हे तर प्रेग्नन्सीनंतर तिच्या चेहऱ्याचे सौंदर्य जास्तच खुलले. करिनाने आपल्या प्रेग्नन्सीदरम्यान सुमारे १८ किलो वजन वाढविले होते. मात्र वाढलेले  वजन तिने प्रेग्नन्सीनंतर काही महिन्यातच कमी केले. यामुळे संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये एवढ्या लवकर वजन कमी केल्याबद्दल तिची प्रशंसा होत आहे. विशेष म्हणजे तिने वजन कसे कमी केले हे जाणून घेण्यासाठी बरेजचण उत्सुकही आहेत. चला जाणून घेऊया करिनाने आपले वजन कसे कमी केले ते. करिना नेहमी आपल्या फिटनेसच्या बाबतीत उत्साही आहे, आणि आता एक मुलगा झाल्यानंतर ती आपले आरोग्य आणि फिटनेसवर कधी तडजोड नाही करु इच्छित. ती वजन कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी जिम आणि योगाच्या माध्यमाने खूपच मेहनत घेताना दिसत आहे. करिना आणि तिची बीबीएफ अमृता अरोडादेखील तिच्या सोबत जिममध्ये मेहनत करीत आहे. या दोघांची चांगली मैत्री आहे. अमृताने तिचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यात करिना जिममध्ये घाम गाळताना दिसत असून ती फिटनेससाठी एवढी मेहनत घेत आहे हे पाहून आपल्याला विश्वासच बसणार नाही. करिनाने फिट राहण्यासाठी आपल्या आहाराकडेही विशेष लक्ष दिले आहे. करिना रोज एक मोठा ग्लास दूध घेते. कारण प्रेग्नन्सी अगोदर आणि प्रेग्नन्सीनंतर शरीरातील कॅल्शियम कमी होते, त्याची कमतरता फक्त दुधच भरुन काढू शकते, शिवाय तिचे असे म्हणणे आहे की, एक ग्लास दूध घेतल्याने अगोदरच्या साइजमध्ये येत आहे. शिवाय ती रोज ८ ते १० ग्लास कोमट पाणी पिते. प्रेग्नन्सी अगोदर आणि नंतर पाण्याची आवश्यकता असते. म्हणून ती फिट राहण्यासाठी पाणी भरपूर पिते. करिना योगा बऱ्याच वर्षापासून करत आहे. योगामुळे मन, शरीर आणि आरोग्य संतुलित राहण्यास मदत होते. करिना आपल्या शरीराची लवचिकता टिकविण्यासाठी वॉर्म अप, पॉवर योग, सूर्य नमस्कार आणि श्वासासंबंधीत व्यायामदेखील करते. शिवाय हिरवा भाजीपाल्याला जास्त पसंत करते, कारण करिना शुद्ध शाकाहारी आहे. वजन कमी करण्यासाठी पनीर, रोटी, पराठा, सोया दूध, दाळ, सलाद आणि सूप आदींचा आहारात ती आवर्जून समावेश करते. ती नास्त्यामध्ये प्रोटीन शेक किंवा फळ खात असते. यामुळे तिला ऊर्जा मिळते आणि वजनदेखील कमी होते. याच बरोबर ती कार्डियादेखील करते. यामुळे तिला प्रेग्नन्सीनंतर फिट राहण्यास मदत मिळते. प्रेग्नन्सीनंतर लगेचच व्यायाम केला जाऊ शकत नाही म्हणून सर्वप्रथम तिने वॉक सुरु केला होता. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. पाहा व्हिडिओ...