शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Health News: सिगारेटमुळे दृष्टी जाण्याचा धोका, अमेरिकेतील संशोधनाचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 07:43 IST

Health News: धूम्रपानामुळे शरीरावर होणारे गंभीर परिणाम होतात, आता सर्वज्ञात आहे. मात्र, सिगारेट किंवा ई-सिगारेटच्या व्यसनामुळे डोळ्यांवर परिणाम होऊन दृष्टी गमावण्याचा धोका संभवतो किंवा काचबिंदूही होऊ शकतो, असा निष्कर्ष अमेरिकेतील एका संशोधनातून काढण्यात आला.

वॉशिंग्टन - धूम्रपानामुळे शरीरावर होणारे गंभीर परिणाम होतात, आता सर्वज्ञात आहे. मात्र, सिगारेट किंवा ई-सिगारेटच्या व्यसनामुळे डोळ्यांवर परिणाम होऊन दृष्टी गमावण्याचा धोका संभवतो किंवा काचबिंदूही होऊ शकतो, असा निष्कर्ष अमेरिकेतील एका संशोधनातून काढण्यात आला.

या संदर्भात कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी संशोधन केले. त्यात सिगारेट व ई-सिगरेट पिणाऱ्यांपैकी कोणाला डोळ्यांचे विकार झाले, याचा शोध घेण्यात आला. भारतात प्रौढ व्यक्तींपैकी २२ टक्के लोकांना सिगारेटचे व्यसन आहे व त्यामुळे दरवर्षी १० लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे भारतीयांसाठीही हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे आहे.

सिगारेट, तंबाखूच्या व्यसनाने कॅन्सर, हृदयविकार असे अनेक आजार जडतात. मात्र, यांचा डोळ्यांवर ही विपरित परिणाम होतो, याबद्दल  पुरेशी जनजागृती झालेली नाही. सिगरेटच्या धुरामध्ये सात हजार प्रकारची विषारी द्रव्ये असतात. सिगरेट पिणाऱ्याच्या रक्तवाहिन्यांत ही विषारी द्रव्ये जाऊन ती शरीरभर पसरतात. त्यामुळे जसे इतर आजार होतात, तसेच डोळ्यांमधील रक्तवाहिन्यांवरही त्याचा परिणाम होत असतो.

सिगारेटमुळे डोळे कोरडे होणे, मोतिबिंदू, डायबेटिक रेटिनोपथी, मॅक्युलर डिजनरेशन, रक्तवाहिन्या खराब होणे असे परिणाम होऊ शकतात. त्यातील काही विकारांमुळे दृष्टी गमावण्याचा धोकाही संभवतो. डोळ्यांतील पेशींचेही सिगरेटमधील विषारी द्रव्यांमुळे नुकसान होते. धूम्रपानामुळे कोणत्याही वयात मोतीबिंदू होण्याचा धोका असतो, असे नेत्रविकार तज्ज्ञांचे मत आहे.

इतरांच्याही प्रकृतीवर होतो विपरीत परिणामसिगारेटचे व्यसन असलेल्यांना काचबिंदू होण्याची शक्यता असल्याचेही एका शास्त्रीय संशोधनात आढळून आले होते. डोळ्यांचे रक्षण करायचे असेल, तर सिगरेट पिणाऱ्यांनी या घातक व्यसनापासून त्वरित दूर झाले पाहिजे. सिगारेट पिणारा केवळ त्याच्याच प्रकृतीची नासाडी करत नाही, तर सिगारेटच्या धुरामुळे इतरांच्या प्रकृतीवरही परिणाम होत असतो.

टॅग्स :Healthआरोग्यSmokingधूम्रपान