शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : ​उन्हाळ्यात बनवा घरगुती आरोग्यदायी शीत पेय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 16:52 IST

उन्हाळ्यात शरीराला गारवा मिळावा म्हणून प्रत्येकजण शीत पेय पिण्याकडे वळतात. मात्र बऱ्याचदा बाहेरचे पदार्थ खाणे-पिणे आरोग्याच्या दृष्टिने हानिकारक ठरते. त्यामुळे आरोग्यास फायदेशीर असे काही पेय आहेत जे आपण घरीच बनवून शकतो.

-Ravindra Moreउन्हाळ्यात शरीराला गारवा मिळावा म्हणून प्रत्येकजण शीत पेय पिण्याकडे वळतात. मात्र बऱ्याचदा बाहेरचे पदार्थ खाणे-पिणे आरोग्याच्या दृष्टिने हानिकारक ठरते. त्यामुळे आरोग्यास फायदेशीर असे काही पेय आहेत जे आपण घरीच बनवून शकतो.फळांमध्ये विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असल्याने विविध फळांचा वापर करुन शीत पेय तयार करु शकता. शिवाय फळांच्या रसात अजून काही पदार्थ मिक्स करून त्याची चव जास्त वाढविता येऊ शकते. यामुळे शरीराला उर्जा मिळते आणि त्वचेच्याही समस्या उद्भवत नाही. * टोमॅटो व काकडी :साहित्य : तीन कप टोमाटोचा ज्यूस, दोन चमचे लिंबाचा रस, दोन लवंगा, एक दालचिनी काडी, एक लहान कांदा किसून, अर्धा कप काकडीचा कीस, चवीपुरते मीठ, तीन चमचे साखर व बर्फाचे क्युब्ज.कृती : कांदा व काकडी किसून घ्यावी, बर्फ सोडून सर्व घटक पदार्थ एकत्र करून फ्रीजमध्ये एक तासभर ठेवावेंत व  नंतर गाळून घ्यावे. सर्व्ह करण्यापूर्वी चांगले ढवळून, प्रत्येक ग्लासात घालून बफार्चे क्युब्ज घालावे  व सर्व्ह करावे.* कलिंगडचे सरबत :साहित्य : एक कलिंगड, चवीपुरते मीठ, दालचिनी/ मिरपूड , साखर एका लिंबाचा रस.कृती : कलिंगड कापून त्याच्या लालबुंद, मधल्या भागातील गर स्कुपने (गोल आकाराचा चमचा आईस्क्रीम काढण्याचा ) काढून एका बाउलमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवावे आणि मग उरलेल्या कलिंगडचा लाल भाग अगदी बारीक चिरून त्याच्या बिया काढून, त्याचा रस काढून तो गाळून घ्यावा.  त्यात मीठ, साखर, दालचिनी पूड किंवा मिरपूड, लिंबाचा रस घालून तासभर फ्रीज मध्ये ठेऊन थंड करावे. सर्व्ह करतेवेळी प्रत्येक ग्लासात थंड सरबत काढून ठेवलेल्या कलिंगडच्या तुकड्यातील एक दोन तुकडे त्या सरबतात घालून प्यायला द्यावे. या सरबतात बर्फाचे क्यूब्ज घालू नये.* सफरचंदाचे पेय :साहित्य : २५० ग्राम सफरचंद, चवीपुरती साखर, एक लिंबू, मीठ.कृती : सफरचंद स्वच्छ धुवून सालासकट बारीक चिरून घ्यावी. साखरेवर लिंबाची साल किसून घ्यावी व ती सफरचंदात मिसळावी. तीन कप उकळीचे पाणी त्यात ओतावे व झाकण घालून ठेवावे. थंड झाल्यावर गाळून घ्यावे. चवीपुरती साखर घालावी. मीठ रुचीप्रमाणे घालावे किंवा नाही घातले तरी चालेल.  सर्व्ह करण्यापूर्वी चांगले ढवळून बर्फ घालून लहान लहान ग्लासातून सर्व्ह करावे.* जिंजरेल :साहित्य: एक किलो प्रत्येकी बेताच्या आकाराचा एक कप आल्याचा रस व लिंबाचा रस, त्याच कपाने मोजून चार कप पाणी.कृती : साखर व पाणी एकत्रित करून साखर पाण्यात चांगली मिसळू द्यावी. ते पानी पाच ते सात मिनिटे उकळावे. गार झाल्यावर आल्याचा रस व लिंबाचा रस गाळून व्यवस्थित  मिसळावा. हे टिकाऊ करण्यासाठी दोन चमचे पाण्यात अर्धा चमचा पोटेशियम मेटाबायसल्फाईड गाळून ते मिश्रण त्या रसात मिसळावे. सर्व्ह करताना उंच ग्लासमध्ये दोन चमचे करड बर्फ व थोडा जिंजरेल सोडा किंवा पाणी गाळून द्यावे.Also Read : ​HEALTH : ​उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्स पिताय, सावधान !