शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
2
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
3
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
4
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
5
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
6
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
7
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
8
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
9
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
10
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
11
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
13
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
14
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
15
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
16
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
17
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
18
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
19
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
20
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या

एलईडी लाईट्सचे घातक परिणाम जाणून घ्या; वेळीच सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 15:52 IST

अतिशय आकर्षक दिसणारे, किफायतशीर ठरणारे एलईडी लाईट्स शरीरासाठी हानीकारक असतात

गेल्या काही वर्षांत भारतात एलईडी लाईट्सचा वापर वाढला आहे. जास्त प्रकाश आणि कमी खर्च यामुळे एलईडी लाईट्स ग्राहकांच्या पसंतीस उरले. त्यामुळे एलईडी लाईट्सच्या मागणीत दिवसागणिक वाढ होत आहे. टीव्हीच्या ट्युबमध्ये, मोबाईल स्क्रीनमध्येदेखील एलईडी लाईट्स वापरण्यात येतात. अतिशय आकर्षक दिसणारे, किफायतशीर ठरणारे हे लाईट्स शरीरासाठी मात्र हानीकारक असल्याचं संशोधनातून सिद्ध झालं आहे. वर्ल्ड जनरल ऑफ बायोलॉजिकल सायकाट्रीनं प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधात एलईडी लाईट्समुळे मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची माहिती देण्यात आली आहे. मोबाईलमधल्या ब्लू लाईटचा परिणाम डोळ्यांवर होतो. त्यामुळे डोळ्यांभोवती काळी वर्तुळं तयार होण्याचा धोका निर्माण होतो. याशिवाय विविध प्रकारचे डोळ्यांचे विकारदेखील उद्भवण्याची दाट शक्यता असते. मोबाईलमधून निघणाऱ्या प्रकाशाचं प्रमाण जास्त असल्यास मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते, असं संशोधकांनी आधी सांगितलं होतं. मात्र आता संशोधकांनी समोर आणलेली माहिती अतिशय चिंताजनक आहे. मोबाईलमधून निघणाऱ्या प्रकाशाचे मानसिक आरोग्यावर आणि झोपेवर खूप घातक परिणाम होतात. माणसाच्या संपूर्ण शारीरिक प्रक्रियेवरदेखील एलईडी लाईट्सचे परिणाम दिसून येतात.पथदिवे, लाईटिंग, मोबाईलचा डिम लाईट यामुळे डोळ्यांना रंगांशी संबंधित विकार होतात. काहींना रंग ओळखण्यात समस्या (कलर ब्लाईंडनेस) येतात. मोबाईलमधला डिम ब्ल्यू लाईट मेलाटोनिनचं उत्सर्जन थांबवतो. याचे झोपेवर गंभीर परिणाम होतात. झोपेचं चक्र बिघडतं. एलईडी फ्लॅश असलेल्या उपकरणांमुळे निद्रानाशाची समस्या उद्भवण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा उपकरणांचा वापर झोपण्यापूर्वी ३० मिनिटं करू नये, असा सल्ला दिला जातो.