शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

Health: हे उपाय करा आणि अंथरुणावर पडताच २ मिनिटांत शांत झोपा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 06:16 IST

Health: झोप ही आपल्या शरीरमनासाठी किती आवश्यक आहे, हे  नव्यानं सांगायची आवश्यकता नाही; पण ही झोप यावी कशी? अनेक जण रात्री बिछान्यावर झोपतात तर खरं; पण डोळे टक्क उघडे आणि नजर आढ्याकडे! रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर करत झोपेची आराधना! 

झोप ही आपल्या शरीरमनासाठी किती आवश्यक आहे, हे  नव्यानं सांगायची आवश्यकता नाही; पण ही झोप यावी कशी? अनेक जण रात्री बिछान्यावर झोपतात तर खरं; पण डोळे टक्क उघडे आणि नजर आढ्याकडे! रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर करत झोपेची आराधना!  शांतपणे आणि पटकन झोप यायला हवी असेल, तर काय करायचं? काही घरगुती आणि सोपे उपाय आहेत, ते करून पाहा. सवय झाली की, अगदी दोन मिनिटांत तुमच्या पापण्या जड होतील आणि तुम्ही निद्रादेवीच्या अधीन व्हाल. अर्थात, हा उपाय नवीन नाही; पण काही दिवस तो चिकाटीनं केला मात्र पाहिजे. त्यासाठी काय कराल? १) आपल्या नेहमीच्या वेळेला (खूप लवकर नाही आणि खूप उशिरा नाही.) झोपायला जा. २) झोपण्याच्या जागी शक्यतो प्रखर प्रकाश आणि आजूबाजूला गडबड नको.३)अंथरुणावर पडल्यावर डोळे बंद करून हळूहळू आणि दीर्घ श्वसन करा.४) संपूर्ण शरीर रिलॅक्स करा. आपल्याला जणू काही वजनच नाही, असा वजनरहित अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. ५) मनातले सर्व विचार काढून टाकण्याचा प्रयत्न करा. फक्त श्वासावर मन केंद्रित करा.६) शरीरातील सर्व ताण हळूहळू निघून जातो आहे, सर्व स्नायू शिथिल होताहेत, अशी कल्पना करा. ७) शरीराचा वरील भाग रिलॅक्स करा. डोकं, चेहरा, जबडा, कपाळ, डोळे, छाती, पाठ, हात.८) त्यानंतर खालील भाग  ताणरहित करा. नितंब, मांड्या, गुडघे, पोटऱ्या, पायांची बोटं.९) आता एकाच वेळी आपलं संपूर्ण शरीर ताणरहित झालं आहे, याचा अनुभव घ्या. या अवस्थेत किमान दहा सेकंद थांबा.१०) मनातले विचारही हळूहळू कमी झाले आहेत आणि आपल्याला शांत वाटतंय याचा अनुभव तुम्हाला येईल.११) एखाद्या आनंदी प्रसंगाचं चित्र आपल्या मनासमोर उभं करा. मन भरकटू नये यासाठी मनाला स्वयंसूचना देत राहा.ज्यांना लवकर झोप येत नाही, त्यांनी काही दिवस नेटानं हा अभ्यास सुरू ठेवावा. शरीर-मनावर त्याचा सकारात्मक परिणाम झालेला  दिसेल. काही दिवसांतच अंथरुणावर पडल्या पडल्या अगदी दोन मिनिटांतच गाढ, शांत झोपेचा अनुभवही तुम्ही घेऊ शकाल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स