Health : आपणासही रात्री झोप येत नाही का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2017 15:36 IST
जर आपणास रात्रभर झोपच येत नसेल तर आपल्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडले आहे, असे समजावे...
Health : आपणासही रात्री झोप येत नाही का?
जर आपणास रात्रभर झोपच येत नसेल तर आपल्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडले आहे, असे समजावे. संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार ज्यांना आयुष्यात झोप न येण्याची समस्या आहे, त्याचे मुख्य कारण म्हणजे अशा मनुष्याच्या हार्माेन्समध्ये होणारे उत्परिवर्तन होय. अमेरिकेच्या रॉकफेलर विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी आपल्या संशोधनात असे म्हटले आहे की, हार्माेन्सच्या बदलाचा परिणाम बॉयोेलॉजिकल क्लॉकवर म्हणजेच जैविक वेळेवर होतो ज्यामुळे रात्री झोप येण्याची आणि सकाळी उठण्याची अवस्था विस्कळीत होते. ७५ पुरुषांमागे एका व्यक्तीस ही समस्या आहे, असेही संशोधनात म्हटले आहे.