शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

​HEALTH : ढेकर आल्यास पोट भरले असे समजू नका, हे आहे खरे कारण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2017 15:09 IST

जेवण झाल्यांनतर बहुतेकजणांना ढेकर येतात. जेवण पोटभरुन झाले म्हणून ढेकर येतात असा बऱ्याचजणांचा समज आहे, मात्र नेहमी ढेकर येण्यामागचे कारण काहीतरी वेगळे आहे.

-Ravindra More जेवण झाल्यांनतर बहुतेकजणांना ढेकर येतात. जेवण पोटभरुन झाले म्हणून ढेकर येतात असा बऱ्याचजणांचा समज आहे, मात्र नेहमी ढेकर येण्यामागचे कारण काहीतरी वेगळे आहे.  * ढेकर कसे येतात?ज्याप्रमाणे कुकरमधील अन्न शिजून जास्त वेळ झाला की वॉल्व्ह आपोआप वर होऊन शिटी वाजते त्याप्रमाणे पोटात जमा झालेला गॅस आवाजासह तोंड व गळ्याद्वारे बाहेर निघतो. यालाच ढेकर येणे म्हणतात. जेवण केल्यानंतर पोटात गॅस तयार होतो. अन्ननलिका व पोटाच्या मध्ये डायफ्रॅम असतो. अन्न पोटात गेल्यावर हे आपोआप बंद होते. यामुळे पोटात गॅस जमा होतो. लेमन सोडा किंवा कोल्डड्रिंक पिल्यास पोटात गॅस तयार होतो. यामुळे शरीराची कंट्रोल रूम असलेला मेंदू गॅस बाहेर काढण्याची आज्ञा देतो. यानंतर काही स्नायू कडक होतात ज्यामुळे डायफ्रॅम उघडते. उघडलेल्या डायफ्रॅममधून गॅस गळा व तोंडाद्वारे बाहेर निघतो. हा गॅस म्हणजे पोट भरल्याची खूण नाही.ढेकर आल्यावर आवाज का येतो?जेव्हा जमा झालेला गॅस अन्ननलिकेत भरतो तेव्हा काही कंपने तयार होतात, यामुळे गॅस बाहेर निघताना आवाज येतो.ढेकर न येणेजर पोटात गॅस तयार होऊनही ढेकर येत नसेल तर गॅस बाहेर निघण्यासाठी आदेश देण्यास मेंदू उशीर करतोय असे समजावे. यामुळे आपल्याला मळमळ व्हायला लागते.ढेकर न आल्यास पोटदुखीची समस्या निर्माण होते, भूक मंदावते शिवाय पचनक्रियादेखील मंदावते.