शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : ​मुलांना कांजण्या झाल्यात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 15:30 IST

कांजण्या हा संसर्गजन्य आजार असून सहसा शाळकरी म्हणजे ५ ते १० वर्षांच्या मुला-मुलींमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.

कांजण्या हा संसर्गजन्य आजार असून सहसा शाळकरी म्हणजे ५ ते १० वर्षांच्या मुला-मुलींमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. आधीच्या काळी गोवरचे प्रमाण इतके होते की अजूनही अंगावर लाल चट्टे दिसले की, तो आजार गोवरच वाटतो. पण गोवर आणि कांजण्यांच्या अंगांवर येणाऱ्या चट्टयामध्ये एक मूलभूत फरक असतो. गोवरामध्ये अंगावर रंगाचा डब्बा ओतल्यावर तो जसा अंगावरून खाली जाईल, तसे अंगावरील पुरळ खाली सरकत जाते आणि कांजण्यांमध्ये सूर्य उगवतो तसे छातीच्या मध्यावरून पुरळ उगवते. काय काळजी घ्याल?कांजण्या हा मुदतीचा आजार असून कुठल्याही विषाणूजन्य आजारासारखा तो आपोआप बरा होतो. यादरम्यान जेवण थोडे कमी जात असेल तरी हरकत नाही, पण भरपूर पाणी प्यावे. या आजाराच्या काळात पचनशक्ती मंदावते म्हणून भूक कमी होते. यासाठी फळे-फळांचा रस देऊ शकता. सुरुवातीच्या चार-पाच दिवस अंगावरचे हे फोड वाढत जातात. फोड वाढले म्हणून घाबरण्याची गरज नसते. ते कमी  आपोआप कमी होतात. त्यांना खाज येते म्हणून तुर्तास खाज कमी होण्याची औषधे घेता येतील. या दरम्यान मुलाच्या बोटांची नखे कापून घ्यावीत. कारण फोडांना खाजवल्यामुळेच जंतुसंसर्ग होतो.या फोडांमुळे चेहऱ्यावर व्रण पडतील अशी भीती असते मात्र सहसा संसर्ग झाला नाही तर व्रण पडत नाहीत. पडले तरी काही आठवड्यात जातात. विशेष म्हणजे एकदा कांजण्या झाल्या की तेच लसीकरण ठरते आणि परत कांजण्या होत नाहीत. मात्र लहानपणीच कांजण्या होण्याअगोदर लसीकरण करुन घेणे योग्य असते.