शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : मोड आलेले कडधान्य खाताय? सावधान !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 18:03 IST

मोड आलेले कडधान्य जितके आरोग्यदायी आहेत तितकेच ते आरोग्यासाठी घातक आहे. ओलावा व दमटपणामुळे साल्मोनेला, लिस्टेरिया आदी किटाणू अंकुरित कडधान्यात आपले घर बनवतात. यामुळे अनेक आजार होऊ शकतात.

-Ravindra Moreबहुतांश लोक आरोग्य सुदृृढ राहावे म्हणून रोजच्या आहारात मोड आलेले कडधान्य वापरतात. यातून आपणास विटॅमिन ‘ई’ भरपूर प्रमाणात मिळते. मात्र हे मोड आलेले कडधान्य जितके आरोग्यदायी आहेत तितकेच ते आरोग्यासाठी घातक असल्याचे एका संशोधनातून जाहीर करण्यात आले आहे. अ‍ॅकॅडमी आॅफ न्यूट्रीशन अ‍ॅन्ड डायटेटिक्सच्या एका संशोधनानुसार कच्चे अंकुरित कडधान्य तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम निर्माण करणारे ठरू शकते. ओलावा व दमटपणामुळे साल्मोनेला, लिस्टेरिया आदी किटाणू अंकुरित कडधान्यात आपले घर बनवतात. यामुळे अनेक आजार होऊ शकतात.    काय होऊ शकते नुकसान?  युरीन इन्फेक्शन :कच्च्या कडधान्यात ‘ई. कोलाय’ नावाचा विषाणू तयार होतो. हा शरीरात जाऊन लघवीच्या संसगार्चा धोका निर्माण करतो.   टायफॉईड :मोड आलेल्या कडधान्यात साल्मोनेला टायफी नामक बॅक्टेरिया तयार होतो. यामुळे टायफॉईड रोग उद्भवतो.   किडनीला धोका :जास्त प्रमाणात अंकुरित कडधान्य खाल्ल्याने त्यातील लिस्टीरिया नामक बॅक्टेरियाचा तुमच्या किडनीवर वाईट प्रभाव होऊन फूड पॉईझनिंग होऊ शकते.   काय उपाय कराल? कडधान्य निश्चितच लाभदायक आहेत. मात्र त्यांचे योग्य प्रकारे सेवन करणे आवश्यक आहे. जर आपण नेहमी आहारात मोड आलेले कडधान्याचा वापर करीत असाल तर ते थोडे उकळून घ्या. जर उकळायचे नसेल तर वाफेवरदेखील शिजवू शकता. या क्रियेमुळे बºयाच बॅक्टेरियांचा नायनाट होऊ शकतो.