शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

कलिंगड जरूर खा, पण 'ही' चूक करू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 10:38 IST

जी फळे कॅल्शियम कार्बाईड वापरून पिकवतात ती भरीत असतात पण रसाळ नसतात.

- डॉ. नितीन पाटणकर (मधुमेहतज्ज्ञ)

माझा मित्र सुशोभन, स्वत:ला खवैय्या म्हणवतो. त्याला खरेतर खादाड हा शब्द शोभून दिसेल. बहुतेक खादाड लोकांना असेच वाटत असते की “आम्ही खवैय्ये आहोत”. त्याला आणखी एक वाईट सवय म्हणजे रस्त्यात उभे राहून गाडीवर जे दिसेल ते खायचं. त्यात ‘बैदा घोटाला, कच्छी डबल रोटी ते डाळंब डोसा, शाॅट पोहे ते सीताफळ आंबा’ सर्व काही आले’. त्यावर तो सांगतो की खाण्याच्या बाबतीत तो संतपदप्राप्त आहे. दर वेळेस असे काही बोलला की मी फक्त तोंड वेडेवाकडे करीत असे. एक दिवस असाच रस्त्यात सिताफळ खात होता. हात पूर्ण बरबटलेले. माझा चेहरा बघून म्हणाला, डॉक्या मी खाण्याच्या बाबतीत आता ‘ स्थितप्रज्ञ खवय्या’ झालो आहे.  हे ऐकून मी त्याला म्हटले खरेच की, तू पु.लं.च्या ‘तुझे आहे तुजपाशी’ मधे काकाजींनी दाखवलेला स्थितप्रज्ञ झाला आहेस खरा. दोन दिवसांनी त्याने काकाजींचा स्थितप्रज्ञ म्हणजे काय हे कोणाकडून तरी समजावून घेतले आणि मला येऊन म्हणतो, पुन्हा मला काकाजींचा स्थितप्रज्ञ म्हणालास तर रायवळ अंब्यासारखा पिळून काढीन. हे बोलताना त्याला कलिंगडांची रास दिसली आणि मग स्वारी एकदम ‘हर हर महादेव’ च्या जोषात, कलिंगडांकडे वळली. 

भैय्या एक कलिंगड ईधर खावे के लिये काटके देना. अंदर से एमदम लालभडक होना चाहिये. और बी एकदम कम होगा तो और अच्छा. पहिले एक चंद्रकोर साईझ का तुकडा निकालो. लालपन दिखाओ और फिर बाकी का काटो. एवढ दिव्य हिंदीत बोलून झाल्यावर तो कलिंगड वाला म्हणाला, “ साहेब आजकाल सगळी कलिंगड लालचुटुक असतात, बघायला लागत नाही. आणि साहेब मी मराठीच आहे, माझ्याशी मराठीत बोललात तरी चालेल. मग काय, त्याने एक मोठ कलिंगड कापले. सुशोभनने लगेच खायला सुरवात केली. खाता खाता तो म्हणाला, “ डाॅक्टर पूर्वीसारख आता त्रास नाही. हल्ली कलिंगड एकदम घट्टमुट्ट असतं. पूर्वी कसा फोड खाताना रस ओघळायचा, हल्ली कलिंगड पण ‘स्वच्छ भारत’ म्हणतात. 

हे ऐकताना मला आठवले, जी फळे कॅल्शियम कार्बाईड वापरून पिकवतात ती भरीत असतात पण रसाळ नसतात आणि रंग येण्यासाठी चक्क कलिंगडाला इंजेक्शन देतात. कार्बाईड मुळे किडनी आणि लिव्हरला इजा होते. लालचुटुक कलिंगड दिसावे म्हणून त्यात लेड क्रोमेट नावाचे द्रव्य इंजेक्ट करतात त्यामुळे ॲनेमिया, स्मृती कमी होणे आणि डोळांना इजा होते. 

याहून महत्त्वाचे म्हणजे कलिंगडाच्या पांढऱ्या दिसणाऱ्या सालीलगतच्या भागात सिट्रुलिन नावाचे द्रव्य मुबलक प्रमाणात असते. ते शरीरात गेल्यास त्यातून आरजिनीन आणि नायट्रस ऑक्साईड बनते जे हृदयाचे आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते. ते आपण टाकून देतो. तेच सुशोभनने केले ते बघून मला केशवसुतांची कविता आठवली. त्यात थोडा बदल करून म्हणावेसे वाटते  ‘सत्व पाखडिता आम्हि, निवडितो ते फोल आम्ही निके’

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स